more 30 workers corona infected of Gharda Chemicals Company in Khed ratnagiri MIDC
more 30 workers corona infected of Gharda Chemicals Company in Khed ratnagiri MIDC 
कोकण

ब्रेकिंग -रत्नागिरीतील या कंपनीतील 30 कामगारांना कोरोनाची लागण : पॉझिटिव्ह रुग्णाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

राजेश शेळके

रत्नागिरी : खेड एमआयडीसीतील घरडा केमिकल्स कंपनीतील 30 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कामगारांची खासगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची रुग्णांची संख्या 942 झाली आहे. एका कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या 33 झाली आहे. रत्नागिरीतील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे.

 
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होताना दिसत आहे. सोमवारी 48 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असल्याने आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या 7 रुग्णांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 634 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 4 तर जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 275 आहे. रत्नागिरी तालुक्यातील बसणी, साळवी स्टॉप परिसर हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

एका डॉक्टरला कोरोनाची बाधा​

सोमवारी आढळलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एकजण डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. राजिवडा येथे या डॉक्टरचे क्लिनिक आहे. त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात सध्या 78 अ‍ॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरणात कक्षात 95 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 81 हजार 668 व्यक्ती दाखल झाले. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 94 हजार 885 आहे.  

एकूण संख्या.... 

* जिल्हात एकूण 12 हजार 733  नमुण्यांची तपासणी
* त्यापैकी 12 हजार 355 तपासणी अहवाल प्राप्त 
* 942 अहवाल पॉझिटिव्ह 
* 11 हजार 413 अहवाल निगेटिव्ह 
* 378 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित 
* बरे झालेले  - 634
* मृत्यू  - 33
* एकूण अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह - 275

संपादन - अर्चना बनगे


 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT