motivational story of rakesh devrukhkar hi Defeat Jehangir to overcome disability 
कोकण

#MondayMotivational : अपंगत्वावर मात करीत जहांगीरपर्यंत झेप!

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) - तालुक्‍याच्या डोंगर कपारीत वसलेल्या अस्तान गावच्या मुलाने आपल्या कलेने राज्य पातळीवर आपली ओळख चित्रकार म्हणून निर्माण केली आहे. राकेश देवरुखकर असे त्यांचे नाव. अत्यंत मानाच्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनासाठी त्यांच्या चित्रांची निवड झाली आहे.

राज्य कला प्रदर्शनात निवड होण्याची दहाव्यांदा किमया

आपल्या अपंगत्वावर मात करीत आत्तापर्यंत तब्बल दहावेळा राज्य कला प्रदर्शनासाठी त्यांच्या चित्रांची निवड झाली आहे. २०१७ चा राज्य पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. 
राकेश हे शहरातील श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील कलाशिक्षक आहेत. चित्रकला हा त्यांचा छंद असून, एखाद्या विषयावर बोलके चित्र काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता त्यांनी चिपळूण-सावर्डे येथे आर्ट टीचर्सचा डिप्लोमा पूर्ण केला. तर सातारा कला महाविद्यालयातून आर्ट मास्टर पदविका प्राप्त केली आहे.

चित्रकलेच्या छंदामुळे  आयुष्याला मिळाले वेगळेच वळण

२००३ ला ते सहजीवन शिक्षण संस्थेत चित्रकला विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. गेल्या वीस वर्षापासून त्यांनी चित्रकलेतून अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज कला विषयातून विविध ठिकाणी कार्यरत आहेत. राकेश यांना त्यांच्या या छंदामुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले. या छंदामुळे त्यांना समाजात विविध ठिकाणी मानसन्मान मिळाला. राकेश यांची खेड तालुक्‍यासह रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी कला प्रदर्शन भरलेली आहेत. तसेच विविधांगी रंगसंगतीच्या रांगोळ्या काढण्यातदेखील राकेश यांचा हातखंडा आहे. कलाकृतीत जिवंतपणा आणण्याचे शिकवले मला चित्रकलेची आवड होती. मी जी चित्रे काढत होतो, त्या चित्रांमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम कसे करायचे, हे मला देवरुखकर सरांनी शिकवले. त्यांचा चित्रकलेचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मी आजदेखील चित्रकलेचे क्‍लास घेत असून, मी उच्च शिक्षित आहे. जी. डी. आर्ट-पेंटिंग ही पदवी मी प्राप्त केली आहे. अशी प्रतिक्रिया सुसेरी येथील शुभम जड्याळ यांनी दिली.

अनेक विद्यार्थी चित्रकलेद्वारे झळकले 

दरवर्षी खेड व दापोली येथे भरणाऱ्या रंगावली प्रदर्शनात राकेश यांच्या कलाकृती पहावयास मिळतात. तर खेड, दापोलीसह चिपळूण-गुहागर या ठिकाणी होणाऱ्या विविध महोत्सवातदेखील त्यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेली शिल्पे पाहायला मिळतात. दरवर्षी प्रशालेच्या माध्यमातून होणाऱ्या चित्रकला स्पर्धा असूदेत अथवा कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या चित्रकला स्पर्धा प्रत्येक वेळी राकेश देवरुखकर हे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी हजर असतात. आज त्यांचे अनेक विद्यार्थी विविध स्पर्धांत चित्रकलेद्वारे झळकले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT