कोकण

रत्नागिरीत महावितरणची थकबाकी वाढतीच; रक्कम 58 कोटींवर

कंपनीसमोर वसुलीचे मोठे आव्हा, नोटीसा जारी; शासकीय थकबाकी दीड कोटी

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : महावितरण कंपनीच्या (mahavitaran) थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. ग्राहकांप्रति सहानुभूती दाखवून तडकाफडकी कारवाई नको, म्हणून थकबाकीदारांच्या जोडण्या अजून कंपनीने तोडलेल्या नाहीत. मात्र आता ती वेळ येणार आहे. जिल्ह्यात ५७ कोटीची असलेली थकबाकी (ratnagiri district) आता काही दिवसांमध्ये ५८ कोटी ४६ लाखावर गेली आहे. यामध्ये १ लाख ६७ हजार २७१ ग्राहकांचा समावेश आहे. तर शासकीय थकबाकी १ कोटी ६६ लाख आहे.

महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक बनली आहे. राज्यात ही थकबाकी ६० हजार कोटींच्यावर आहे. थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान कंपनीसमोर आहे. कंपनीने थकबाकीदारांना अनेक नोटीसा दिल्या आहेत. कर्मचारी पाठवून त्यांना बील भरण्याबाबत प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फारसे यश आले नाही. कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे वसुलीसाठी नवा फंडा काढला आहे. सहा संचालकांना परिमंडळनिहाय वसुलीसाठी फिल्डवर काढले आहे. कोकण परिमंडळाला गडकरी यांची नियुक्ती केली आहे.

थकबाकीमध्ये जिल्ह्याचा आकडा देखील मोठा आहे. काही दिवसांपूर्वी ५७ कोटीची थकबाकी आता ५८ कोटी ४६ लाखांवर गेली आहे. यामध्ये १ लाख ६७ हजार २७१ ग्राहकांचा समावेश आहे. १ लाख ३२ हजार ०३६ घरगुती ग्राहकांची २४ कोटी ८१ लाख, १८ हजार ०३३ व्यापारी ग्राहकांची ११ कोटी, २ हजार ३३५ उद्योजकांची ६ कोटी थकबाकी आहे. शासकीय थकबाकी १ कोटी ६६ लाखावर आहे. यामध्ये शाळा, ग्रामपंचायती, शासकीय कार्यालये आदींचा समावेश आहे.

थकबाकीदारांकडुन वसुलीसाठी आता कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मुख्य अभियंता सायनेकर यांनी स्पष्ट केले होते. थकबाकीदारांवर कारवाई न केल्यास स्थानिक पातळीवरील कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या बडग्यामुळे कंपनीचे अधिकारी अडचणीत येऊन ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास ढळू नये, यासाठी ग्राहकांना अनेक सवलीत दिल्या आहेत. मात्र आता कंपनीच अडचणीत आल्याने कठोर कारवाई विषय महावितरणपुढे पर्याय नाही.

दृष्टिक्षेपात

  • महावितरण थकबाकी - ५८ कोटी ४६ लाख

  • ग्राहकांची एकूण संख्या - १ लाख ६७ हजार २७१

  • घरगुती ग्राहक - १ लाख ३२ हजार ०३६

  • घरगुती ग्राहक थकबाकी - २४ कोटी ८१ लाख

  • व्यापारी ग्राहक - १८ हजार ०३३

  • व्यापारी ग्राहकांची थकबाकी - ११ कोटी

  • उद्योजक ग्राहक - २ हजार ३३५

  • उद्योजकांची थकबाकी - ६ कोटी

  • शासकीय थकबाकी - १ कोटी ६६ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Trusts: टाटा ग्रुपमध्ये वाद! 157 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रस्टमध्ये दोन गट, काय आहे प्रकरण?

Nobel Prize 2025 : क्वांटम संशोधनाला सलाम! जगाला आश्चर्यकारक फायदा; तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

Gold Crash: सोन्याचा फुगा लवकरच फुटणार; भाव 77,700 रुपयांवर येणार, तज्ञांचा धक्कादायक इशारा

Indian Air Force Day 2025: किती शक्तीशाली आहे भारतीय वायुसेना, 'या' दहा मुद्द्यांद्वारे जाणून घ्या

INDU19 vs AUSU19 : ५-०! जे सिनियर्सना नाही जमलं, ते ज्युनियर्सनी केलं; ऑस्ट्रेलियाला घरात घुसून लोळवलं, रचला इतिहास

SCROLL FOR NEXT