MSEDCL Warriors brought Konkan out of darkness in just 50 days. 
कोकण

गुहागर, मंडणगड व दापोलीतील ५० दिवसांत ६२८ गावे झाली प्रकाशमय...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ‘वावटळीत दिवा लावणे’, हा वाक्‍यप्रचार आपण ऐकत आलोय. पण उद्या, भविष्यात कोणी चक्रीवादळात महावितरणचा दिवा, असा शब्दप्रयोग केला तर नवल वाटायला नको. कारण तसे काम महावितरण कंपनीने केले आहे. तेही कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात! निसर्ग चक्रीवादळात महावितरण कंपनीची यंत्रणा भुईसपाट झाली. ४७ उपकेंद्रे बंद पडली, ५ हजार ७०८ रोहित्र जमिनदोस्त झाली, जिल्ह्यातील ६२८ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. गुहागर, मंडणगड व दापोली या तीन तालुक्‍यांना सर्वाधिक फटका बसला. मात्र, अथक परिश्रमानंतर ५० दिवसांत सर्व गावे प्रकाशमय केली. 

चक्रीवादळाचा गुहागर, मंडणगड व दापोली या तीन तालुक्‍यांना सर्वाधिक फटका बसला. एकप्रकारे अर्धा जिल्हाच अंधारात गेला होता. त्यात कोकणात व विशेष करुन चक्रीवादळ बाधित भागात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला होता. हा विस्कटलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी सर्वप्रथम वीजपुरवठा सुरळीत होणे आवश्‍यक होते. वादळाच्या दुसऱ्याच दिवशी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांनी रायगड जिल्हा दौरा केला.

संपूर्ण कोकणातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यांनी त्याच दिवशी आदेश देऊन महाराष्ट्रातून कोकणाच्या मदतीला अतिरिक्त कुमक पाठवली. रोहित्र व वीजखांबासह विविध साहित्यही मुबलक प्रमाणात पाठविले. शिवाय आलेली पथके साधनसामुग्रीसह आली. मदत पथकापुढे कामासोबत तिथे जाणे, विलगीकरण, जिल्हाबंदी यांसह अनेक आव्हाने होती. या सर्व आव्हानांना तोंड देऊन महावितरणच्या वॉरिअर्सनी कोकणाला अवघ्या ५० दिवसांत अंधारातून बाहेर काढले.


सोपे नव्हते काम..
आज एक विजेचा खांब उभा करायचा असेल तर किमान दहा ते पंधरा जणांच्या सहकार्याची गरज पडते. त्यात हे खांब डोंगरदऱ्यातून, कोकणाच्या मुसळधार पावसात वाहतूक करून जागेवर पोहोचवणे हे सुध्दा एक आव्हानच होते. या संपूर्ण कामात वीज कर्मचाऱ्यांना स्थानिक कोकणी माणसांनी मोलाची मदत केली. अनेक ठिकाणी चहापानाची व्यवस्थाही या सर्वांनी केली. म्हणूनच हे अवघड काम बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कामगार मंडळींनीही आनंदाने केले. त्यातील अनेकांना विलगीकरणातही जावे लागले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT