Murder of a young man from Sindhudurg working in a hotel in Goa 
कोकण

गोव्यात हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या सिंधुदुर्गातील तरुणाचा खून

सकाळवृत्तसेवा

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - गोव्यात अंजुणा येथील एका हॉटेलात काम करणाऱ्या पिकुळे (ता. दोडामार्ग) येथील युवकाचा सहकारी कर्मचाऱ्याने सुऱ्याने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना काल (ता. 20) मध्यरात्री घडली. जेवताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून ती हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विश्‍वनाथ सदाशिव गवस (वय 26, पिकुळे शाळेचीवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या खूनप्रकरणी उत्तरप्रदेश येथील रामभरोसे निषाद ऊर्फ मुन्नालाल याला पोलिसांनी अटक केली आहे. 

लॉकडाउनमुळे विश्‍वनाथ काही आठवडे घरीच होता. आठ दहा दिवसांपूर्वी तो गोव्यात कोरोना चाचणी करून दोन दिवस तेथेच क्वारंटाईन राहून मग कामावर हजर झाला होता. नेहमीप्रमाणे कामे आटोपून रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान सर्व कामगार जेवायला बसले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून मुन्नालाल आणि विश्‍वनाथ यांच्यात वाद झाला. त्यावेळी मुन्नालालने रागाच्या भरात बाजूला असलेला सुरा उचलून त्याच्यावर वार केला. तो वर्मी लागल्याने विश्‍वनाथ याचा मृत्यू झाला. त्याबाबतची माहिती मिळताच अंजुणा (ता. बार्देश) पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी संतोष आर्लेकर यांनी पोलिस पथकाच्या मदतीने मुन्नालाल याला अटक केली. 

विश्‍वनाथने सावंतवाडी येथील आयटीआयमधून इलेक्‍ट्रिकलचा कोर्स केला होता. तो मनमिळाऊ आणि हसतमुख होता. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचा गावी आला असताना अपघात झाला होता. त्यातून तो सुदैवाने बचावला होता. त्याचा गोव्यात खून झाल्याचे कळताच पिकुळे गावावर शोककळा पसरली. त्याचा मित्रपरिवारही अचानक आलेल्या बातमीने हादरला. त्याच्या मागे आई, वडील आणि छोटी बहीण असा परिवार आहे. 

आधार गेला 
विश्‍वनाथची घरची परिस्थिती हलाखीची आहे. लॉकडाउनमुळे ती आणखी खालावली होती. त्याची छोटी बहीण दोडामार्गमधील जनता बाजारमध्ये अलीकडे कामाला जायची. वडील मतिमंद आहेत. आई एकदम साधी. त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार विश्‍वनाथवर होता. त्याच्या कमावण्यावर घर चालायचे; पण त्याच्या जाण्याने आई, वडील आणि बहिणीचा आधारच हरपला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT