nanar project kokan devlopment kokan marathi news 
कोकण

पाच वर्षाने परत घ्या, पण साडेचार हजार कोटी द्या...

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी ) : पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्यव्यवसायातून राज्याची आर्थिक बाजू सक्षमपणे सांभाळण्याची ताकद कोकणात आहे. कोकणच्या विकासासाठी प्रत्येक वर्षी ४ हजार ५०० कोटी द्या. ते फुकट किंवा मदत म्हणून नको, मेहरबानी तर अजिबात नको. पुढच्या पाच वर्षात कराच्या रुपाने ते परत घ्या, अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.


ते म्हणाले, ‘‘दहा वर्षांसाठी साडेचार हजार कोटी देणे सरकारला अवघड नाही. कारण सरकारचे बजेट चार लाख कोटीचे आहे. या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये २४ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सरकारने तीन महिन्यांसाठी मंजूर केल्या आहेत. ६० वर्ष साखर कारखानदारीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला माझा विरोध नाही. राज्यातील दूध उत्पादक, ऊस, कापूस, कडधान्य, केळी, संत्री, द्राक्ष बागायतदारांना तसेच सूतगिरण्यांना सरकार मदत करत आहे. त्यांना सबसिडी आणि कर्जमाफी दिली जाते. तशी कोकणातील शेतकऱ्यांना दिली जात नाही.

कोकणात फलोत्पादन, मत्स्य, पर्यटन, बंदरविकासासाठी शून्य तरतूद आहे. एमटीडीसीने पर्यटन विकासासाठी हातभार लावले नाही. कोकण केवळ देवभूमी नाही तर डॉलरभूमीसुद्धा आहे. फलोत्पादनातून पाच हजार कोटीचे परकीय चलन सरकारला मिळते. कोकणातून साडेचार लाख टन मत्स्य उत्पादन होते. या माध्यमातून पंधरा हजार कोटीचे उत्पादन सरकारला मिळते.

कोकणात पर्यटनावर आधारित दहा हजार छोटे-मोठे व्यवसाय सुरू आहेत. यातून सरकारला पाच हजार कोटी रुपये मिळतात. इतर व्यवसायातून हजारो कोटी रुपये मिळतात. १६०० कोटी रुपये महसूलकडून मिळतात. एवढे असूनसुद्धा जिल्ह्याला केवळ जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून १०० ते १५० कोटी रुपये सरकार देते. 

 हेही वाचा- या पठ्ठ्याने चोरली चक्क मंदिरातील दानपेटी अन्.... ​लोकसंख्या दहा वर्षात दहा टक्‍क्‍याने कमी
कोकणात दहा वर्षात एकही उद्योग आला नाही. सरकारने दिलेले उद्योग वाईट होते, असे नाही तसेच ते चांगले होते, असेही म्हणता येणार नाही. कोकणातील लोक नोकरीसाठी स्थलांतर करत आहेत. ते मुंबई, पुण्यात येतात आणि झोपडपट्टीत राहतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या दहा वर्षात दहा टक्‍क्‍याने कमी झाली आहे, याकडे श्री. जाधव यांनी लक्ष वेधले.

१६ कलमी कार्यक्रम जाहीर केला होता
बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी १६ कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. तो अहवाल कृतीमध्ये आणला गेला असता, तर कोकणची दुर्दैवी अवस्था झाली नसती. दांडेकर, बर्वे, केळस्कर समित्या नेमल्या गेल्या. पण एकाही समितीचा अहवाल अमलात आणला गेला नाही, याकडे त्यानी लक्ष वेधले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

Panchang 8 July 2025: आजच्या दिवशी गणपतीला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 8 जुलै 2025

kolhapur News : पावसाचा फटका! 'पन्हाळा तालुक्यातील ३३४० शेतकरी सापडले आर्थिक संकटात'; अद्याप शासनाकडून भरपाई नाही..

SCROLL FOR NEXT