narayan rane sakal
कोकण

डिवचण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर देऊ : शिवसेना

अर्चना बनगे

रत्नागिरी: नारायण राणेंच्या अटक नाट्यानंतर आज जन आशीर्वाद यात्रेचा रथ कोकणात येणार आहे. राणे यांची तोफ धडाडणार की शांत बसणार आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नक्कीच प्रत्युत्तर देऊ असा आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतला आहे घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी राणे यांना 'व्हायरस' ची उपमा दिली आहे. यावर नारायण राणे काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

थोड्याच वेळात नारायण राणे रत्नागिरीत विमानतळावर पोहोचतील. नारायण राणे यांचे स्वागत करण्यासाठी निलेश राणे, नितेश राणे हे विमानतळावर दाखल झाले आहेत.भाजपचे नेते आशिष शेलार हे नारायण राणे यांच्या सोबत येणार आहेत. त्याचबरोबर प्रसाद लाड त्या ताफ्यातून ‌सहभागी होणार आहेत.

शिवसेना आणि भाजपचा संघर्ष तीव्र होऊ नये यासाठी रत्नागिरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. नियोजित वेळेनुसार रत्नागिरी नारायण राणे यांचे विमान दाखल होणार होते. मात्र पुढील अर्ध्या तासात ते विमानतळावर येतील अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे. रत्नागिरीत ढोल- ताशाच्या गजरात नारायण राणे यांचे जंगी स्वागत भाजप कडून करण्यात येणार आहे . कार्यकर्ते हळूहळू जुना हनुमान मंदिर जवळ आले असून, या ठिकाणाहूनच जनाशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. ही यात्रा सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा रत्नागिरीतल्या प्रत्येक चौकात तैनात केला आहे .

आज दिवसभर नारायण राणे रत्नागिरीत आहेत. दुपारी ते पत्रकार परिषदेत घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना 'व्हायरस' ची उपमा दिली आहे. यावर नारायण राणे काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT