leaders
leaders esakal
कोकण

'भाजप'च्या तगड्या राणेंविरोधात सेनेच्या दोन वाघांची लागणार वर्णी?

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना आपला बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी राणेंसमोर कोणाला भिडवणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

चिपळूण : कोकण (konkan) आणि मुंबईत (mumbai) आपला पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपाने नारायण राणे यांना मंत्रिपदाच्या रूपाने बळ दिले. शिवसेना आपला बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी राणेंसमोर (narayan rane) कोणाला भिडवणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. राणेंना आव्हान देईल, असा नेता शिवसेनेला शोधून त्याच्यामागे पक्षाची ताकद उभी करावी लागणार आहे.

कोकण हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये आठपैकी सहा शिवसेनेकडे आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा आहे. खासदार शिवसेनेचा आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची दीर्घकाळ सत्ता आहे. येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai municipal corporation) निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.

कोकणातील मतदार तेथे महत्वाचे असतात. कोकणातील चाकरमानी मुंबईच्या प्रत्येक भागात असल्यामुळे शिवसेनेच्या सत्तास्थापनेत चाकरमान्यांचा मोठा सहभाग असतो. भाजपला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची व कोकणातही पक्ष मजबूत करायचा आहे, यासाठी भाजपने नारायण अस्त्र बाहेर काढले आहे. शिवसेनेने उदय सामंत (uday samant) यांना मंत्रिपद, सिंधुदुर्गचे पालकमंत्री पदही दिले. सामंत सध्या राणेविरोधात ऊभे राहिलेले दिसत आहेत. खासदार विनायक राऊत राणेंसमोर पहिल्यापासून उभे आहेत. (vinayak raut)

त्याच प्रकारची रणनीती आखावी लागेल..

वैभव नाईक, दीपक केसरकर, राजन साळवी आणि भास्कर जाधव हे चार आमदार राणे यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात. यापैकी कोणाला तरी बढती देऊन किंवा पक्षाची शक्ती यांच्यामागे उभे करून राणे यांना आव्हान देण्याचा शिवसेनेसमोर पर्याय आहे. राणे काँग्रेसमध्ये आणि भास्कर जाधव राष्ट्रवादीत असताना राणेंना जाधव यांनी आव्हान दिले होते. जाधव यांच्यामागे राष्ट्रवादीने पूर्ण ताकद उभी केली होती. त्याच प्रकारची रणनीती शिवसेनेला आखावी लागणार आहे.

जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार

मराठा आरक्षणावरून राजकारण ढवळून निघत आहे. राणे हे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे मराठा समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोकण आणि मुंबईत पक्ष बळकट करण्यासाठी भाजपने राणे यांना बढती दिली आहे. पुढील आठवड्यात राणे कोकणात जन आशीर्वाद यात्रा घेऊन दाखल होणार आहेत. राणे यांचा नियोजितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने उपयोग केला जाईल. महाविकास आघाडीमुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना भाजपकडे वळवण्यासाठी प्रयत्न होईल. राणे यांच्या उपस्थितीमध्ये काहींचे पक्षप्रवेश केले जातील. भाजपच्या या रणनीतीसमोर शिवसेना कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"भाजपने नारायण राणे यांना बळ दिले तरी कोकणातील जनता शिवसेनेच्या पाठीमागे कालही ठामपणे उभी होती, आजही आहे आणि यापुढेही राहील. व्यक्तीकेंद्रित राजकारण करण्यापेक्षा आम्ही सामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा चाकरमानी आणि मुंबईतील मतदार शिवसेनेच्या ताब्यात देतील, असा मला विश्वास आहे."

- विनायक राऊत, खासदार

एक दृष्टीक्षेप..

  • मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार

  • मुंबईच्या प्रत्येक भागात कोकणातील चाकरमान्यांचे वास्तव्य

  • शिवसेनेच्या सत्तास्थापनेत चाकरमान्यांचा मोठा सहभाग

  • महानगरपालिकेची निवडणूक जिंकाण्यासाठी भाजप प्रयत्नशिल

  • भाजपने काढले नारायण अस्त्र बाहेर; कोकणातही पक्ष मजबूतीचे लक्ष

  • भाजपच्या रणनीतीसमोर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT