Fishing Boat Harnai Port Ratnagiri esakal
कोकण

बुडालेल्या नौकेवरील खलाशांना वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी; तब्बल 12 तास समुद्राशी झुंज, नरेश ठरला 'देवदूत'

चार खलाशांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या एका सहकाऱ्याने १२ तास अथांग समुद्रात पोहताना मोठमोठ्या लाटांशी झुंजत स्वतःच्या जीवाची बाजी लावली.

राधेश लिंगायत

नौकेपासून २० फुटांवरून एक भले मोठे मालवाहू जहाज अतिवेगाने गेले. त्यामुळे मोठमोठ्या लाटा उसळल्या आणि नौका बुडाली.

हर्णै : बुडालेल्या नौकेवरील (Boats) चार खलाशांचा जीव वाचविण्यासाठी त्याच्या एका सहकाऱ्याने १२ तास अथांग समुद्रात पोहताना मोठमोठ्या लाटांशी झुंजत स्वतःच्या जीवाची बाजी लावली. नरेश रामचंद्र चोगले असे या बाजीगरचे नाव आहे. त्याच्या सहकाऱ्यांसाठी नरेश देवदूत ठरला. हर्णै पाजपंढरी पंचक्रोशीमध्ये खलाशांचे कौतुक होत आहे.

२५ डिसेंबर २०२३ ला रात्री ते २६ ची पहाटेपर्यत हा थरार सुरू होता. पाजपंढरीतील नीलेश पेढेकर यांनी गावातीलच एका मच्छीमाराची नौका (Fishing Boat) चालवायला घेतली होती. २५ तारखेला नरेशने आणि त्याचे खलाशी सकाळीच साडेअकराच्या सुमारास मासेमारीसाठी निघाले.

नौकेवर तांडेल नरेश रामचंद्र चोगले (४६), पराग नरेश चोगले (१८), वैभव गजानन चोगले (२३, रा. सर्व पाजपंढरी) आणि दीपक चंद्रकांत खालू (२२) वाशी (दिघी), दिलीप भुनेश्वर (४८) मेंदडी (दिघी) असे पाच जण होते. बोऱ्या कारूळ (ता. गुहागर) गावाच्या समोर हर्णै बंदरापासून साधारण २६ किमीच्या अंतरावर ६ ते ९ वाजेपर्यंत मासळी पकडण्यासाठी पहिल्यांदा जाळी लावली. पहाटे अडीचच्या सुमारास मोठा प्रसंग ओढवला.

नौकेपासून २० फुटांवरून एक भले मोठे मालवाहू जहाज अतिवेगाने गेले. त्यामुळे मोठमोठ्या लाटा उसळल्या आणि नौका बुडाली. खलाशांनी तिथेच पोहायला सुरुवात केली. सगळे सकाळी ७ वाजेपर्यंत पोहतच होते. त्यानंतर त्यांना फार लांब नौका दिसली. ती खलाशांपासून साधारण १० ते १२ किमीच्या अंतरावर होती. नरेशनी सहकाऱ्यांना सांगितले की, लवकरच पोहत जाऊन ती नौका घेऊन येतो. वाचलो तर परत येतो, तुम्ही मात्र धीर सोडू नका.

त्याचवेळी मुंबईतून गोवा अशी एक पॅसेंजर बोट खलाशासमोरून गेली. त्यांना मदतीसाठी हात केला. त्यांनीही खलाशांना हात केला. थोड्या अंतरावर जाऊन ते परत आले. तोपर्यंत नरेश १२ किमी पोहोत गोव्याच्या पर्ससीननेट नौकेजवळ पोहोचला होता. त्यांनी लगेच त्याला बोटीमध्ये घेतले. त्या नौकेवरचा तांडेल कृष्णा सारंग याने ताबडतोब नौका चालू करून घटनास्थळी नेली. दोन ते अडीचच्या सुमारास घटनास्थळी पोहोचून चार खलाशांना त्या नौकेवर घेतले. त्यानंतर नरेशनी घरी संपर्क साधला. हर्णै बंदरातून ताबडतोब फायबर नौका घेऊन तातडीने घरचेही पोहोचले. २६ तारखेला संध्याकाळी ६ च्या दरम्यान सुखरूप ताब्यात घेऊन रात्री ९:३० च्या दरम्यान सर्व हर्णै बंदरात पोहोचले.

नेमकं घडलं काय

  • नौकेजवळून मालवाहू जहाज अतिवेगाने गेले

  • मोठमोठ्या लाटा उसळून नौकेत पाणी शिरले

  • सारे घाबरले, एवढं पाणी बाहेर काढणे अशक्य

  • नौकेचे इंजिनदेखील चालू करायला मिळाले नाही

  • नौका बुडू लागताच सर्वांनी लाईफजॅकेट घातली

  • फक्त १५ मिनिटांत फायबर नौकेला जलसमाधी

लाईफ जॅकेट घालून एवढा वेळ पोहल्यामुळे सर्वांनाच दुखापत झाली आहे. पोहून पोहून हातपाय प्रचंड दुखत आहेत. सर्वांना हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी सोडले. घटना घडल्यापासून सर्व खलाशी घरीच आहोत. यामध्ये शासनाकडून कोणतेही सहकार्य आलेले नाही.

-नरेश चोगले, हर्णै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT