Aaditi Arjun Aarya Sakal
कोकण

राष्ट्रीय लाठी-काठी स्पर्धेत भाऊ बहिणींची दैदीप्यमान कामगिरी

पहिल्या राष्ट्रीय लाठी काठी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भाऊ बहिणींनी दापोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

राधेश लिंगायत

हर्णे - येथील बहीण भाऊ कु. अदिती आणि  कु. अर्जुन मिलिंद पिंपळे यांनी राज्यस्तरीय तसेच नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय लाठी काठी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून दापोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दहा वर्षाच्या आतील या बालकांच्या दैदीप्यमान कामगिरीमुळे तालुक्यातून कौतुक होत आहे.

राज्यस्तरीय झालेल्या स्पर्धेत वेगवेगळ्या गटांमधुन एकुण २००० मुलानी सहभाग नोंदवला होता. त्या स्पर्धेत अदिती मिलिंद पिंपळे व अर्जुन मिलिंद पिंपळे यांना सुवर्णपदक. तसेच कु. आर्या मिलिंद पिंपळे हिला रौप्यपदकाने गौरविण्यात आले होते. यापुढील पहिल्या राष्ट्रीय लाठी काठी स्पर्धेत अदिती पिंपळे व अर्जुन पिंपळे यांच्यासह देशातील एकूण ४२७ स्पर्धकांनी वेगवेगळ्या गटातून सहभाग नोंदविला होता. आणि त्याही स्पर्धेत अदिती व अर्जुन यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेछांचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत ज्या मुलांना सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनाच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येणार होते.

नोव्हेंबर २०२० मध्ये जय भवानी प्रतिष्ठान हर्णैच्या माध्यमातून पाच दिवसांचे लाठी काठी प्रशिक्षण शिबीर कोल्हापूर मधील श्री. भिसे  व दापोलीतील सुरेंद्र शिंदे व चिन्मय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते. तसेच या दोघांनीही या स्पर्धकांना चांगले प्रशिक्षण दिले होते. तसेच लाठी इंडिया ऑर्गनायझेशन रत्नागिरी चे अध्यक्ष श्री. उत्तम पाटील यांचे देखील चांगले सहकार्य लाभले आहे. त्यामुळे परिसरातून त्यांच्यावर देखील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ता. २८ एप्रिल २०२१ रोजी पहिली राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच पहिली राष्ट्रीय स्पर्धा ता. २८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आली होती. सदर राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल बाप्पाच्या आगमना दिवशी लागल्यामुळे सुवर्णपदक विजेत्या मुलांचा आनंद द्विगुणित झाला.

राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत अर्जून पिंपळे याने ८ वर्षाखालील मुले या गटात तर आदिती पिंपळे हिने १० वर्षाखालील मुली या गटात सुवर्णपदक जिंकलेले आहे. अवघ्या ६ वर्षीय अर्जुन व ९ वर्षीय अदिती या दोघांनी राष्ट्रीय स्पर्धेत पारंपरिक खेळात सुवर्ण पदक मिळवून हर्णे गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे तसेच राज्याचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या लहानग्यांनी मिळवलेल्या अतुलनीय यशाबद्दल जय भवानी प्रतिष्ठान हर्णै तर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT