Nationalist Women's Territory Secretary namrta kubal in sindudurg kokan marathi news  
कोकण

वेंगुर्लेत राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिवपदी नम्रता कुबल... 

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले (सिंधुदूर्ग) : तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाली आहे. तसे लेखी पत्र नम्रता कुबल यांना प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजियाताई खान, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी हा निर्णय जारी केला. 

कुबल यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस संघटना मजुबुतीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामाची पोच प्रदेश राष्ट्रवादीच्या महिला नेतृत्वाकडून घेतली आहे. पक्ष संघटना वाढीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे कुबल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  

उत्कृष्ट कामाची पोच पावती

शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, जिल्ह्यातील बेसिक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमित सामंत, कार्याध्यक्ष अबिद नाईक, भास्कर परब, प्रवीण भोसले, सुरेश दळवी, प्रसाद रेगे, व्हीक्‍टर डॉंन्टस, नंदूशेठ घाटे, बाळ कनयाळकर, नाझीर शेख, राजू पाताडे, पुंडलिक दळवी, डॉ. साठे, दिपिका राणे, सत्त्यवान साटेलकर, सुप्रिया परब, डॉं. संजीव लिंगवत, धर्माजी बागकर आदींनी अभिनंदन केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT