nature cave in ratnagiri the fort of ratnadurg is nature created in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत पर्यटनाला येताय, हे ठिकाण पाहिलंय का ?

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी गुहा ही रहस्यमय मानली जात होती. ती मानवनिर्मित असावी असेही बोलले जायचे. ही गुहा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरली आहे. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने या गुहेचे संशोधन करून ही मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मितच असल्याचे स्पष्ट केले आहे. 
बाहेरून भव्य दिसणार्‍या या गुहेचा शेवट 200 फुटांवरच आहे. 

यासंदर्भात रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे गौतम बाष्टे यांनी सांगितले, गेली अनेक वर्षे रत्नदुर्ग माउंटेनिअर्स अनेक साहसी मोहीमा राबवत आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्रेक वॉटरवॉलजवळील गुहेतील साहसी अनुभव सर्व सामान्य जनतेला व पर्यटकांना देणे. पण हा इव्हेंट आटोपल्यावर बर्‍याच पर्यटकांचे कायम प्रश्‍न असायचे. ही गुहा त्या डोंगरावरून दिसणार्‍या समुद्रातील गुहेला मिळते का ? आपण तिथे गेला आहेत का ? कोणी जाणकार या त्या गुहे विषयी सांगू शकेल का ? याला कोणाकडेच ठोस उत्तर नव्हते.

ही गुहा खूप आतपर्यंत आहे. पण पाण्यामुळे आणि भरतीच्या भीतीने तसेच ऑक्सिजन कमी पडतो म्हणून अनेकजण मागे फिरले. त्यामुळे ठोस उत्तर शोधण्यासाठी रत्नदुर्ग माउंटेनिसअर्स टीमने आत जाऊन यायचेच, हा निर्णय घेतला. या मोहिमेसाठी गिर्यारोहणाचे अनुभव असणारे आणि पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास असणारे पट्टीचे पोहणारे असे रत्नदुर्गचे सदस्य सोबत होते, असेही बाष्टे म्हणाले.

रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू यांच्यासोबत गणेश चौघुले, पपा सुर्वे, जितेंद्र शिंदे, किशोर सावंत, शैलेश नार्वेकर, शेखर मुकादम, अक्षय चौघुले, ओंकार सावंत, हर्षल चौघुले, यश सावंत ही टीम 16 डिसेंबरला गुहेत प्रवेश करून शेवटपर्यंत जाऊन मोहीम यशस्वी केली.

नियोजनामुळे शोधमोहीम फत्ते

या गुहेत आतापर्यंत रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने हजारो पर्यटकांना नेऊन आणले आहे. या वेळी गुहेत शिरताना उसळणार्‍या लाटा, सतत बदलणारा प्रवाह आणि सतत दगडांवर (खडपांवर) आपटण्याची भीती होती. पण यासाठी गेला महिनाभर अभ्यास करून आराखडा बनवला. कोणी कुठे कुठल्या लाटेसोबत आत जायचे, कुठे थांबायचे, कोणी कधी आणि कसे बाहेर यायचे याचेही नियोजन केले. दुपारी 2:30 ला सुरू झालेली मोहीम भरती-आहोटीची वेळ साधत, किती वाजता पाण्याबाहेर यायचे आहे हे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे सर्वजण सायंकाळी 5:30 ला सुरक्षित बाहेर आलो, असे रत्नदुर्ग माउंटेनिअर्सतर्फे सांगण्यात आले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT