nature hurricane attack in harne bandar in ratnagir 
कोकण

तीन दिवस झाले तरी मालकाचा पत्ता नाहीच ; जहाजप्रश्‍नी प्रशासनाने ग्रामस्थांना सोडले वार्‍यावर...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे तीन दिवसापूर्वी अँकर तुटून मिर्‍या किनार्‍यावर धडकलेले एम. टी. बसरा स्टार जहाज अद्यापही तिथेच अडकले आहे. त्यातील तेलगळतीमुळे मिर्‍या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून आज ग्रामस्थांसह सागरी सीमा मंचाच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालयावर धडक मारली. जहाजाच्या मालकाचे नाव शोधण्यात प्रशासनाने तीन दिवस घालवले. जिल्हा प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित, वित्तहानी होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.


एम. टी. बसरा स्टार या 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे जय हिंद चौक, भाटीमिर्‍या येथील समुद्रकिनारी भले मोठे मालवाहू लोखंडी जहाज बंद स्थितीत येऊन थडकले. हे जहाज बंधार्‍याला आपटत असून घरांना जोराचे हादरे बसत आहेत. त्यामुळे घरांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी, वित्त व जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे. ही हानी टाळण्यासाठी जहाज त्वरित हलविण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली.


मिर्‍या ग्रामस्थ व सागरी सीमा मंचाने प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांची भेट घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. या वेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रमुख स्वप्निल सावंत, तालुका प्रमुख अतुल तथा बाबा भुते, राजीव कीर, मिर्‍या ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व सागरी सीमा मंच महिला सदस्य सौ. तनया शिवलकर, भाटीमिर्‍या ग्रामस्थ महेश तळेकर, विजय तळेकर, शशिकांत सनगरे, सुरेश लाखण आदी उपस्थित होते.या जहाजावरील 13 खलाशी क्वारंटाईन केले आहेत. त्यांना घेऊन बंदर अधिकारी जहाजावर जाणार असून तिथल्या कागदपत्रांद्वारे अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. तत्काळ कार्यवाही करून मिर्‍या ग्रामस्थांची या संकटातून सुटका करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


“जहाजाचे नाव व रजिस्ट्रेशन नंबर संबंधित वेबसाईटवर टाकल्यानंतर मालकाचे नाव व माहिती कळते. तरीही 3 दिवसांत प्रशासकीय यंत्रणेला मालकाचा पत्ता मिळू शकला नाही, हे दुर्दैव आहे.”
- संतोष पावरी, सागरी सीमा मंच, कोकण प्रांत प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा अखिल चित्रेंचा आरोप

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

SCROLL FOR NEXT