नवरात्र sakal
कोकण

नवरात्रोत्सवातून एकोप्याचं दर्शन; मंडणगडची रिक्षा संघटनेचा अनोखा नवरात्र

पंचवीस वर्षांपासून एकता, समता, बंधुत्व आणि सामंजस्य निर्माण

सचिन माळी.

मंडणगड : जय भवानी मित्र मंडळ व रिक्षा संघटना देव्हारेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांपासून एकता, समता, बंधुत्व आणि सामंजस्य निर्माण करणारा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यातून सर्वधर्मीय नागरिकांमध्ये एकोपा व एकजुट अशी विविधतेतून एकतेचे दर्शन घडून येत आहे. मंडळाने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे.

१९९२ साली मंडणगड तालुक्यातील देव्हारे बाजारपेठ परिसरात रिक्षा स्टॅंडजवळ संघटनेच्या वतीने नवरात्र उत्सव सुरु करण्यात आला. एका छोट्या झोपडीतून सुरु झालेला हा उत्सव आज मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अनेक धर्माचे रिक्षा व्यावसायिक संघटनेचे सभासद आहेत. व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात.

त्यातून वादविवाद निर्माण होत असतात. मात्र ग्रामीण भाग असूनही या संघटनेतील सदस्यांनी आपली एकजूट कायम ठेवत मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र राहून हा उत्सव साजरा करीत आहेत. परिसरातील अनेक पंचक्रोशीतील सर्व धर्मांचे नागरिक उपस्थित राहून दर्शन घेतात. त्यात विविधतेतून एकतेचा संदेश मिळतो. चिंचघर येथील भारजा नदी पात्रात मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष अजय म्हाब्दी, उपाध्यक्ष हरीचंद्र फराटे, सेक्रेटरी रामचंद्र फराटे, विपुल म्हाब्दी, तुषार करावडे, सुनील भावे, संजय म्हाब्दी, शशिकांत शिंदे, संजय पवार, शैलेश पवार, संतोष काजारे, अरविंद मोरे परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT