NCP leaders entry cancelled in district planning committee in chiplun 
कोकण

कोकण : राष्ट्रवादीमधील धुसफूस थेट शरद पवारांपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी यांची वर्णी लागली. या निवडी करताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले नसल्याने राष्ट्रवादीत धुसफूस सुरू झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत ही धुसफूस पोचवली जाणार आहे. श्री. जाधव हे जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. अन्य काही पदे त्यांच्याकडे आहेत. असे असताना त्यांना हे पद दिले आहे. एका व्यक्तीवर कारभाराचा किती भार द्यायचा, एकाकडेच किती पदे द्यायची याचाही श्रेष्ठींनी विचार करायला हवा, अशी भूमिका मांडली जात आहे. 

जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी जिल्हा नियोजनवर जाण्यास इच्छुक होते; मात्र पदाधिकाऱ्यांची थेट नावेच जाहीर केल्याने अनेकजणांची निराशा झाली. निवड कशा पद्धतीने झाली, याबाबत काहींनी चौकशीही केली. त्यामुळे नाराज झालेल्या माजी सभापती शौकत मुकादम यांनी आपली नाराजी थेट व्यक्त केली. ही पदे कुणी वाटली आणि कोणाच्या आदेशाने हे समोर आले पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा पवित्राच काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचे शौकत मुकादम यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्ष ही कुणाची मालमत्ता नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवड कशी केली असा सवाल मुकादम यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांना जर किंमत नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

राजापूरपासून ते मंडणगडपर्यंत क्रियाशील कार्यकर्ता पक्षात नाही का स्वतः मेहनत घेऊन अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या आणल्या आहेत; मात्र त्यांना सन्मान न देता आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवड केली गेली, हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहेत.

"परस्पर निवड करणे हे योग्य नाही. कार्यकर्त्याच्या घामावर, मेहनतीवर पक्ष उभा राहतो; पदे मात्र त्याला मिळतच नाहीत. ज्यांच्याकडे पदांचा भरणा आहे त्यांनाच पुन्हा पदे दिली जातात. हे पूर्णतः चुकीचे असून आम्ही ते सहन करणार नाही."

- शौकत मुकादम, माजी सभापती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT