NCP Shivsena Non Alliance In Ratnagiri City President Election  
कोकण

महाविकास आघाडीला कशामुळे लागला रत्नागिरीत ब्रेक ?

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - राज्याच्या राजकारणात नव्यानेच उदयाला आलेल्या महाविकास आघाडीला रत्नागिरीत ब्रेक लागला आहे. नगर पालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार जाहीर केला. पोटनिवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष आणि सेनेला रामराम ठोकलेल्या मिलिंद कीर यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत कॉंग्रेसकडून पाठिंबा मिळवण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू असून राष्ट्रवादीच्या या निर्णयाचा शिवसेनेला धक्का बसला आहे. 

राहूल पंडित यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत सेनेचे राहूल पंडित थेट जनतेमधुन नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. यानंतर पक्षाच्या धोरणानुसार त्यांनी राजीनामा दिला होता. या निवडणुकीसाठी राज्याप्रमाणे महाविकास आघाडी स्थापन होणार का याबाबत चर्चा सुरू होती. परंतु, रत्नागिरीतील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी करण्यास केलेल्या तीव्र विरोधामुळे रत्नागिरीत महाविकास आघाडीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच फिस्कटली. 

कीर यांना पक्षाचा एबी फाॅर्म

मंगळवारी पक्षाचा एबी फॉर्म मिलिंद कीर यांना दिला. जयस्तंभ येथील पक्षाच्या तालुका कार्यालयात कीर यांना एबी फॉर्म दिला. या वेळी जिल्ह्यातील आणि तालुक्‍यातील दिग्गज नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतही सुदेश मयेकर यांनी शहरात लक्षवेधी मते घेतली होती. याचा फायदा नगराध्यक्ष निवडणुकीतही होईल, असा विश्‍वास मयेकर यांनी व्यक्त केला आहे. मिलिंद कीर यांनी मंगळवारीच राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. 12 डिसेंबरला अर्ज दाखल करणार असल्याचे कीर यांनी सांगितले. 

नगराध्यक्षपदाचा चांगला अनुभव 

कीर यांना नगराध्यक्षपदाचा चांगला अनुभव आहे. अनेक वर्षे ते नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत नगरपरिषदेवरील आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यांच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा मोठा फायदा निवडणुकीत होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादीला आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT