Negative report of the three people kokan marathi news 
कोकण

खुशखबर :चिपळूणात दिल्लीत गेलेल्या त्या तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह...

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण  (रत्नागिरी) : चिपळूण तालुक्यातील दोणवली येथे दिल्लीहून आलेल्या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीमध्ये ते तिघेही निगेटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा श्‍वास घेतला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यानीही या वृत्ताला दुजोरा दिला.

दिल्ली येथे 12 मार्च रोजी तबिल जमातीचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आले होता. या मेळाव्यासाठी चिपळूण तालुक्यातून तिघेजण गेले होते. ते तिघेही दोेणवली येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती. हे तिघे दिल्लीहून आल्यानंतर चिपळूण शहरात राहत होते. लॉकडाऊन झाल्यानंतर ते दोणवली येथील आपल्या घरी गेले. शुक्रवारी दुपारी आरोग्य यंत्रणेला याबाबतची माहिती मिळाली.

आरोग्य विभागाने सोडला सुटकेचा श्‍वास

सांयकाळी आरोग्य विभागाचे अधिकारी दोणवली भागात गेले. त्या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ते तिघेही निगेटिव्ह आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा श्‍वास घेतला. याबाबत माहिती देताना डॉ. यादव म्हणाल्या, आम्ही त्या तिघांची चाचणी घेतली त्यामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला. तरीही आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. शक्य तो त्यांनी घराबाहेर पडू नये. नातेवाईकांमध्ये मिसळू नयेे अशाही सूचना केल्या आहेत. त्यांच्या संपर्कात येणार्‍यांनाही योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना आम्ही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT