Negative reports of youths from Sindhudurg and Goa who have been trapped in Iran 
कोकण

 इराणमध्ये अडकून पडलेल्या सिंधुदुर्ग व गोव्यातील युवकांना मिळालाय 'हा' दिलासा...

सकाळ वृत्तसेवा

बांदा - इराणमध्ये अडकून पडलेल्या सिंधुदुर्ग व गोव्यातील ९ युवकांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. साहजिकच सर्व युवकांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कणकवलीचे आमदार नितेश राणे सातत्याने या युवकांच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनाही त्यांनी आवश्यक सुचना दिल्याचे सागर पंडीत या युवकाने सांगितले आहे.

गोव्यातील चष्मा बनविणार्‍या जीकेबी कंपनीच्या इराण येथील कारखान्यात काम करण्यासाठी सिंधुदुर्ग व गोव्यातील ९ युवक दोन वर्षांपूर्वी गेले होते. त्यात सागर पंडीत (सातोसे), उदय पाटकर (वेत्ये), विनोद पवार (मळेवाड), विकास सुतार (साटेली भेडशी), नितीन गावडे (चंदगड), अजय परब (साळ), मितेश राऊळ (शिरसई), रोहन पेडणेकर (हळदोणा) व सचिन कळंगुटकर (धारगळ) यांचा समावेश आहे. दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी संपल्याने १४ मार्च रोजी ते भारतात परतणार होते. मात्र, सध्या इराणमध्ये करोना व्हायसरचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे विमान वाहतुक सेवा बंद असल्याने सर्व युवक त्याठिकाणी अडकून पडले आहेत.

संबंधित युवकांनी आपण इराणमध्ये अडकल्याची माहिती आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत पोचविण्याची विनंती केली होती. तेच आम्हांला या संकटातून बाहेर काढतील असा ठाम विश्चास व्यक्त केला होता. हा विश्वास सार्थ ठरविताना आमदार राणे यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून ठोस पावले उचलली. त्यामुळेच प्रत्यक्ष मदतकार्याला सुरूवात झाल्याचे संबंधित युवकांनी सांगितले.

रविवारी दुपारी इराण आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व नऊही युवकांना अॅम्बुलन्समधून तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांच्या करोना संदर्भात सर्व चाचण्या करण्यात आल्या. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून सर्व युवकांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. साहजिकच त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या तीन-चार दिवसांत खास विमानातून सर्वांना भारतात आणले जाणार आहे. त्यानंतर १५ दिवस त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Election : कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना महायुतीची एकतर्फी लढत; पॅनल 30 मध्ये ठाकरे गटाचा शिंदे सेनेला बिनशर्त पाठिंबा!

Badlapur MIDC Explosion: बदलापूर 'MIDC' हादरली! केमिकल कंपनीत तासभरातच एकामागोमाग पाच ते सहा भीषण स्फोट

Nitish Kumar Hijab Controversy: नितीश कुमारांच्या ‘हिजाब’ प्रकरणातील 'ती' डॉक्टर तरूणी अखेर सरकारी नोकरीत झाली रुजू

Shakun Shastra : डोळे फडफडणे, तळहात खाजवणे, अंग थरथरणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रातील रहस्य काय सांगते पाहा..

Akola Political : अखेर ‘अकोट विकास मंचा’तून ‘एआयएमआयएम’ बाहेर; अकोटमध्ये सत्तेचा नवा खेळ सुरू!

SCROLL FOR NEXT