कोकण

दैव बलवत्तर! आंबोली दरीत उडी घेतलेली विवाहिता बचावली

सकाळ डिजिटल टीम

आंबोली : येथील मुख्य धबधब्याजवळ (amboli waterfall) दरीत उडी मारलेल्या नवविवाहीतेला वाचवण्यात पोलिसांना यश आले. दैव बलवत्तर असल्याने इतक्या खोल दरीत उडी मारूनही ती बचावली. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर तिला बाहेर काढण्यात आले. ही मुळ अहमदनगर (ahemadnagar) येथील असून नवर्‍यासोबत वेंगुर्ले तालुक्यात राहते. तिने उडी का घेतली याबाबतचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

संबंधित तरुणी मुळची अहमदनगर जिल्ह्यातील आहे. साधारण तीस वर्षाची ही तरुणी वेंगुर्ले (vengurle) तालुक्यात आपल्या नवर्‍यासोबत राहते. तिचा नवरा सरकारी नोकरीत आहे. आज अचानक ती घरातून निघाली. किरकोळ भांडणातून ती बाहेर पडल्याचे समजते. यानंतर ती सावंतवाडीत (sawantwadi) येवून तेथून एसटीमधून आंबोलीत (amboli) आली. स्टॅण्डवर उतरून तेथील रिक्षात बसली व रिक्षाचालकाला घाटातील धबधब्याजवळ नेण्यास सांगितले. ती रिक्षाने मुख्य धबधब्याजवळ उतरली. तेथून पुढे काही अंतरावर जात दरड कोसळलेल्या ठिकाणी काहीकाळ थांबली. तेथे चप्पल आणि ओढणी खाली काढून ठेवत संरक्षक कठड्यावर चढून तिने थेट दरीत उडी घेतली.

हा प्रकार त्या रिक्षाचालकाने पाहिला. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक तौसीब सय्यद, उपनिरीक्षक आनंद यशवंते, जमादार बाबु तेली, हवालदार दत्ता देसाई, दीपक शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर तातडीने आंबोलीतील बचाव पथकाला बोलावण्यात आले. या पथकातील दीपक मेस्त्री आणि अजीत नार्वेकर हे दोरीच्या सहाय्याने खाली उतरले. त्यांच्यासोबत प्रदीप गावडे, राकेश अमृसकर, वामन पालेकर, शंकर गावडे, विशाल बांदेकर, मायकल डिसोजा, अमरेश गावडे यांनी शोध मोहीम सुरू केली. पाऊस आणि धुक्यामुळे यात अडथळे येत होते.

सुमारे अर्ध्यातासाच्या शोधानंतर ती तरुणी दरडीत काही अंतरावर झाडीत अडकलेली दिसली. तिला कंबरेला, खांद्याला, हाताला मार लागला होता. पथकाने दोरीच्या सहाय्याने तिला सुखरूप वर आणले. त्यानंतर येथील आरोग्यकेंद्रात तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तिने उडी का मारली हे स्पष्ट झाले नव्हते. आपली कोणाबद्दलही तक्रार नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. यानंतर तिच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. तिला नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वेळीच खबर मिळाली म्हणून

संबंधित नवविवाहीतेने उडी मारली ते ठिकाण बरेच खोल आहे. खाली दगडही भरपूर आहेत. संबंधित तरुणीला उडी मारताना त्या रिक्षाचालकाने पाहिल्यामुळे वेळीच मदत मिळाली. अन्यथा अनर्थ होण्याची भिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT