Shiv Sena MP Vinayak Raut strongly criticized nilesh rane comment Google
कोकण

विनायक राऊतांना असे आपटू की, परत ते कोकणात दिसणार नाहीत

- प्रशांत हिंदळेकर

मालवण : खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आपल्या खासदारकीच्या काळात कोणतीही विकासकामे केली नाहीत. नारायण राणेंचे नाव घेतले की आपले सगळे काही झाकले जाईल या भ्रमात अजूनही ते वावरत आहेत; मात्र २०२४ ला राऊतांना एवढ्या जोरात आपटणार की परत कोकणात ते दिसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज येथे दिला.

राऊत यांनी आपल्या खासदारकीचा वापर फक्त स्वतःच्या मुलाबाळांना आणि कुटुंबांना सेटल करण्यासाठी केला आहे. राणेंनी कार्यकर्त्यांना जेवढे जपले, तेवढ कोणालाही जमले नाही. वाक्याचा विपर्यास्त करण्याची जुनी सवय विनायक राऊतांना असून त्यांच्या बुद्धीप्रमाणेच ते सगळ्या गोष्टीचा विचार करणार अशी टीकाही राणे यांनी केली.

येथील निलरत्न निवासस्थानी राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, संतोष कोदे, नगरसेवक दीपक पाटकर, महेश मांजरेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राणे म्हणाले, "फुकटचे श्रेय घेण्यासाठी सगळीकडे पुढेपुढे असणारे विनायक राऊत विकास कामांमध्ये कुठेही दिसत नाहीत. म्हणून त्यांना नेहमी राणे लागतात. राणेंशिवाय राऊतांचे कार्य शुन्य आहे. ते कधीही विकासकामांवर बोलताना दिसत नाहीत. ज्यांनी साधी एक बालवाडीही उघडली नाही, अशा माणसाची राणेंवर बोलण्याची कुवत नाही. अगोदर त्यांनी काहीतरी करून दाखवावे. साधी डिस्पेंसरी तरी उघडून दाखवावी.

स्वतःच्या खासदारकीचा वापर त्यांनी मुलाबाळांना सेट करण्यासाठी केला आहे. चिपी विमानतळ असो अथवा मुंबई गोवा महामार्गावरील टोल नाका. या प्रत्येक ठिकाणी स्वतःला काहीतरी मिळण्यासाठी राऊतांची धडपड आहे. त्यासाठी ते केंद्रातील मंत्र्यांना भेटत आहेत. विमानतळावर सिक्युरिटीसाठी मिळणारे कंत्राट स्वतःच्या भाच्याला मिळण्यासाठी विनायक राऊत प्रयत्न करत असल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT