कोकण

वाघ बकरी चहा आणि टायगर बामसुद्धा येतो; राणेंचे राऊतांवर टीकास्र

खासदार राऊत यांच्या विधानावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका होत आहे

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chamdrakant patil) यांनी काल पुण्यात केले होते. त्यावर वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी उत्तर दिले आहे. वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली आहे. आज ते उत्तर महाराष्ट्र (north maharashtra) दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. दरम्यान खासदार राऊत यांच्या या विधानावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका होत आहे. यावर भाजपचे निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करुन त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

ते म्हणाले, नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाचा चहा आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हंटल्यावर वाघ झाले असते, तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. हे त्यांनी समजून घ्यावे, असा घणाघात त्यांनी केला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील पुणे येथे म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो. अशा प्रतिक्रीयेत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport Update : पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांना ७ मे पासून पैसे वाटप; ऑक्टोबरमध्ये सुरू होणार काम

Purandar Airport : पुरंदर विमानाळाच्या भूसंपादनाचा दर निश्चित; एक एकरसाठी शेतकऱ्यांना मिळणार......

IPL 2026 : मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहची काळजी घ्यायला हवी... रवी शास्त्रींनी का दिलाय हा सल्ला? धोक्याचा इशारा की आणखी काही?

Akola Protest: महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानावर अकोल्यात संतापाची लाट; ७ मे रोजी अकोल्यात जाहीर निषेध सभा

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांना आत्मचिंतनाची गरज, भाजप नेते मंगल पांडे यांचा पलटवार

SCROLL FOR NEXT