nilesh rane criticized on the bhaskar jadhav in chiplun rathangeri 
कोकण

'आम्ही ठरवू तेव्हा तुम्हाला अडवू' ; राणे यांचे शिवसेनेला आव्हान

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची दादागिरी मी एका दिवसात संपवली त्यामुळे प्रमोद जठार यांना अडवण्याची भाषा करू नका. आम्ही ठरवू तेव्हा तुम्हाला अडवू असे आव्हान भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला दिले. खासदार विनायक राऊत यांच्यावरही त्यांनी टिका केली.नयेथील ब्राह्ममण सहाय्यक संघाच्या सभागृहात भाजपचा तालुकास्तरावरील मेळावा झाला. 

यावेळी मार्गदर्शन करताना निलेश राणे म्हणाले, भाजपचे नेते प्रमोज जठार यांना कापसाळ रेस्टहाऊसच्या पुढे येऊ देणार नाही असे शिवसैनिकांचे म्हणने आहे. कापसाळमध्ये शिवसेनेने आरटीओ सुरू केले आहे, की तेथून पुढचा रस्ता शिवसेनेच्या मालकीचा आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची दादागिरी मी एका दिवसात संपवली होती. त्यामुळे अडवा - अडवीची भाषा कोणी करायची नाही. त्यांना धड बोलताही येत नाही. ते सीआयडी ऐवजी शीआयडी असे बोलतात. कोरोनाच्या काळात चाकरमान्यांना गावी येऊद्या अशी मागणी भास्कर जाधवांनी केली. चाकरमानी गावी आल्यानंतर भास्कर जाधव गायब झाले. त्यांना शोधण्याची वेळ प्रशासनावर आली. मुंबईतून येणार्‍या चाकरमान्यांची जबाबदारी मी घेईन असे म्हणणार्‍या भास्कर जाधवांनी पाच रूपयाच्या मास्कचेही वाटप केले नाही. त्यांच्या मतदार संघातील निम्यापेक्षा जास्त गावात मोबाईलची सेवा मिळत नाही. त्यामुळे गुहागरचा विकास करण्यात जाधव अपयशी ठरले आहेत. 

प्रमोद जठार यांनी राऊत यांना कर्मदरीद्री असे म्हटंले होते, मी तर राऊत यांना पूर्णदरिद्री म्हणेन. दरिद्री म्हटले म्हणून राऊत यांना राग आला. मोदी लाटेत ते निवडून आले, नाहीतर त्यांची निवडून येण्याची पात्रता नव्हती. मला ब्रिज हे चिन्ह असताना तीन लाख मतदारांपर्यंत पोहचलो. हिंमत असेल तर धनुष्यबाण बाजूला करून निवडणूक लढवा. म्हणजे तुमची पात्रता काय आहे ते समजेल. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले, मग खासदार राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण करून का घेतले नाही. रत्नागिरी जिल्ह्यात कोणता ठेकेदार कामे, कोणाला पोट ठेका द्यायचा हे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे भाऊ ठरवतात. रत्नागिरी जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे. मात्र जिल्ह्याचा विकास करण्यात ते अपयशी ठरले आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी एक कारखाना सुद्धा मतदार संघात आणला नाही. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण स्वतः ठेकेदार आहेत. ते स्वतःच कामे करतात. शिवसेनेत ठेकेदारी पद्धत वाढल्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटल्याचा आरोपही राणे यांनी केला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT