nilesh rane critised to uddava thakrey on old topic of dilip dhavale in ratnagir
nilesh rane critised to uddava thakrey on old topic of dilip dhavale in ratnagir 
कोकण

'चिठ्ठीत उद्धव ठाकरे तुमचंही नाव आलंय, स्वतःला अटक करून घेणार का' ? निलेश राणेंचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्यात भाजपाकडून आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका केली जात आहे. भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी एका जुन्या घटनेची आठवण करून देत स्वतःला अटक करणार का ? अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर या वादाला तोंड फुटले आहे. 

दरम्यान नीलेश राणे यांनी उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट ट्विटरला शेअर केले आहेत. “कराल काय स्वतःला अटक? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो,” असं नीलेश राणे यांनी यावेळी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 दिलीप ढवळे यांच्या कुटुंबियांनी उस्मानाबाद येथे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन रखडलेल्या या तपासावर संताप व्यक्त केला. अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी तत्परतेने तक्रारीची दखल घेतली तसेच दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आत्महत्याग्रस्त दिलीप ढवळे यांच्या पत्नींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले आहे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष  विजय दंडनाईक या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले असल्याचे लिहिले होते. त्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे आत्महत्येची वेळ आली. आपल्या नावे घेतलेली सर्व रक्कम कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देऊनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीन वेळा लिलाव पुकारला गेला. सततचा दुष्काळ आणि केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचेही त्यात लिहिले होते.

संपादन - स्नेहल कदम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT