Nitesh Rane Sakal
कोकण

नितेश राणे यांना जामिनासाठी अजून एक दिवस वाट पहावी लागणार

भाजप आमदार नितेश राणे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन दिवसांनी आज सुनावणी पूर्ण झाली आहे.

विनोद दळवी

भाजप आमदार नितेश राणे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन दिवसांनी आज सुनावणी पूर्ण झाली आहे.

ओरोस - भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत (Sandesh Sawant) यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर (Bail Form) दोन दिवसांनी आज सुनावणी (Hearing) पूर्ण झाली आहे. मात्र, निकाल देण्यासाठी वेळ हवा असे सांगत न्यायाधीश एस व्ही हांडे निकाल राखून ठेवला आहे. उद्या दिवसभरात केव्हाही हा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही जामीन मिळणार की नाही? याचे उत्तर मिळालेले नाही. त्यासाठी अजून एक दिवस वाट पहावी लागणार आहे.

१८ डिसेंबर रोजी कणकवली शहरातील नरडवे फाट्यावर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर आणखी दोन व्यक्तींना अटक केली होती. यातील एका आरोपीला पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले होते. ती व्यक्ती सचिन सातपुते असून ते आ नितेश राणे यांचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यामुळे या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने आ नितेश राणे व संदेश सावंत यांनी २७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर २७ रोजी सुनावणी न होता ती २८ रोजी झाली. २८ रोजी सुनावणी पूर्ण न झाल्याने आज उर्वरित सुनावणी घेण्यात आली. परंतु सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करण्यास तब्बल साडेतीन ते चार तास घेतले. त्यानंतर आ राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. तोपर्यंत कार्यालयीन वेळ संपलेली होती. त्यामुळे जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी निकाल राखून ठेवला. उद्या निकाल देण्यात येईल असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT