Sangameshwar Crime esakal
कोकण

Sangameshwar Crime : संगमेश्वरमध्ये वसतिगृहातील अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन; 'या' ऑडिओमुळे प्रकार आला समोर

Sangameshwar POSCO Crime : एका वसतिगृहात अल्पवयीन मुलींसोबत गैरप्रकार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी नयन मुळ्ये, प्रथमेश मुळ्ये, संजय मुळ्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संगमेश्वर : एका वसतिगृहात अल्पवयीन मुलींसोबत गैरप्रकार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित संस्थेच्या तिघांविरुद्ध पोस्को (POSCO Crime) आणि विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस (Police) अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. याप्रकरणी नयन मुळ्ये, प्रथमेश मुळ्ये, संजय मुळ्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तालुक्यातील एका वसतिगृहात अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन होत असल्याची ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. तपासासाठी पोलिस रवाना झाले. मात्र, या प्रकाराला एका मुलीने वाचा फोडण्याचे काम केले आणि एका ऑडिओमुळे हा प्रकार समोर आला, असे सांगितले जात आहे.

या प्रकारात तीन मुली पीडित असल्याचे सांगण्यात आले. गणपतीच्या सुट्टीत काही मुले-मुली आपापल्या गावी गेले होते. परंतु या मुली तिथेच राहिल्या होत्या आणि संबंधितांच्या घरी होत्या. तेव्हा या मुलींचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मुलींच्या सांगण्यावरून फिर्यादीने ही तक्रार ऑनलाईन दाखल केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Express : कोल्हापूर–मुंबई प्रवासासाठी हक्काची गाडी हरवली; सह्याद्री एक्स्प्रेसच्या विस्तारावर रेल्वेची उदासीन भूमिका

केंद्र सरकारकडून अपेक्षा नाही, ते वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करतायत; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

SBI Interest Rate : SBI चा मोठा निर्णय! FD चे दर बदलले, होम लोन व EMI स्वस्त होणार? नवीन दर पाहा

Mumbai Local Megablock: तिन्ही लोकल मार्गांवर उद्या मेगाब्लॉक! सर्व सेवा रद्द पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या सविस्तर...

Latest Marathi News Live Update : निफाडमध्ये शेतकऱ्याच्या कांदा पिकावर तणनाशकाची फवारणी, पाच एकर पिक जळून खाक

SCROLL FOR NEXT