Office bearer selection Zilla Parishad came to Sindhudurg in the form of a camp kokan political marathi news 
कोकण

बंदोबस्तामुळे तणाव : सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेला आले छावणीचे रूप 

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाजा वगळता अन्य सर्व दरवाजे भर दुपारी 1 वाजल्यापासून बंद करण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह अभ्यंगताना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी तीन वाजता विशेष सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भाजप आणि शिवसेना पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पोलिस प्रशासनाच्यावतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदमध्ये कडक पोलिस बंदोबस्त होता. भर दुपारी जेवणाच्या वेळी 1 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार वगळता अन्य सर्व दरवाजे बंद केल्याने कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेमध्ये कामासाठी येणाऱ्या अभ्यंगताना दुपारचे जेवण, नाश्‍ता, करण्यासाठी बाहेर पडणे मुश्‍कील बनले.

मुख्य दरवाज्यामधून बाहेर पडून जेवण, चहा, नाश्‍ता करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी, अपंग, वृद्धांना जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडून इमारतीला संपूर्ण वळसा घेऊन जावे लागले. जिल्हा परिषद इमारतीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या तसेच आधारकार्ड कामासाठी येणाऱ्या जनतेलाही याचा त्रास सहन करावा लागला. 

बंदोबस्तामुळे तणाव 
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी यापूर्वी केव्हाही एवढा कडक पोलिस बंदोबस्त पाहिला नाही, असा बंदोबस्त आजच्या निवडीसाठी पाहायला मिळाला. यामुळे सकाळपासून शांत असलेले जिल्हा परिषदेतील वातावरण अचानक पोलिस बंदोबस्त वाढवल्याने अधिक तणावग्रस्त बनल्याचे दिसत होते. 
 
सदस्य वगळता अन्य लोकांना बंदी 
जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक प्रक्रियेवेळी जिल्हा परिषद सदस्य वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. शिवाय आवारातही अन्य कुणालाही प्रवेश दिला नाही. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्यांना दुपारी 1 वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रवेश दिला गेला नाही. त्यांना प्रवेशद्वाराबाहेरच ताटकळत राहावे लागले. ओळखपत्र तपासूनच पोलिसांकडून प्रवेश दिला जात असल्याने ओळखपत्र सोबत नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर थांबावे लागले.

संपादन- अर्चना बनगे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates :बीड अहिल्यानगर रेल्वे धावली

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT