Raigad sand news sakal
कोकण

Raigad News : दाभोळमध्ये अधिकृत रेती विक्री केंद्र सुरू,600 रुपये ब्रास दर; नोंदणीकृत वाहनाद्वारेच वाहतूक

रेती खरेदीदारास आधारकार्डद्वारे महाखनिज पोर्टलवर नोंदणी करून प्रत्येकी दहा ब्रास रेती देण्यात सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

Mahad News: रेतीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे भाव, त्‍यातून होणारा काळाबाजारावर प्रतिबंध लावण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आता सुधारित रेती धोरण अवलंबले असून सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा, या दृष्टीने मागेल त्यास फक्त सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने रेती देण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे.

त्यानुसार महाड तालुक्यातील दाभोळ येथे तालुक्यातील पहिले अधिकृत रेती केंद्र नुकतेच सुरू झाले आहे. रेती खरेदीदारास आधारकार्डद्वारे महाखनिज पोर्टलवर नोंदणी करून प्रत्येकी दहा ब्रास रेती देण्यात सुरुवात झाली आहे.

यामुळे सर्वसामान्यांना आता माफक दरात रेती खरेदी करणे शक्य होणार आहे. बेकायदा उत्‍खनन व वाहतुकीमुळे रेतीचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना घर व इतर बांधकाम करताना अतिरिक्‍त खर्च खर्च व्हायचा.

सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना माफक दरात रेती मिळू शकेल. रेतीच्या वाहतूक खर्चाचा भार ग्राहकांना उचलावयाचा असून यासाठी केंद्रावरील जीपीएसप्रणाली बसवलेल्या नोंदणीकृत वाहनांद्वारेच ही वाहतूक करण्यात येणार आहे.

सध्या दाभोळ येथे पहिले केंद्र सुरू झाले असून काही कालावधीतच तालुक्यातील मुठवली येथेही अशाच प्रकारे केंद्र सुरू होणार आहे. या पोर्टलवरून नोंदणी होताना काही प्रमाणात अडचणी उद्भवल्‍यास तक्रारी प्राप्त होत असून यावर निश्चितपणे तोडगा काढून सर्वसामान्यांना मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध होईल.

- महेश शितोळे, तहसीलदार, महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT