Olive ridley sea turtle conservation in Konkan update sakal
कोकण

कोकणात कासव संवर्धनाला संशोधनाचा नवा आयाम

- मयूरेश पाटणकर

कोकणातील किनाऱ्यांवर अनेक वर्ष ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालण्यासाठी येत आहेत. पूर्वी ही अंडी सापडली तर लोक खाण्यासाठी घेऊन जात असतं. कासवाच्या पाठीसाठी हत्या होत असे. सह्याद्री निसर्गमित्रचे भाऊ काटदरे यांनी २००३ मध्ये वेळास (ता. मंडणगड) मधून कासव संवर्धन मोहिमेला सुरवात झाली. १० वर्षांत स्वःखर्चाने ८० किनाऱ्यांवर संवर्धन सुरू केले. वनखात्याने या चळवळीला नैतिक आधार दिला. २०१२ नंतर वनखाते प्रत्यक्ष सहभागी होऊ लागले. २०१४ मध्ये ही चळवळ भाऊंनी वनखात्याकडे सोपवली. जिल्ह्यात १६ किनाऱ्यांवर वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्याद्वारे कासव संवर्धन केले जाते. त्यासाठी कासवमित्रांची नियुक्ती करून त्यांना मानधन दिले जाते.

कासव महोत्सव

अंडी घालायला आलेल्या कासवाला पाहण्याची संधी दुर्मिळ आहे. त्या तुलनेत कासवाच्या पिल्लांना समुद्रात जाताना पाहणे थोडे सोपे आहे. या दोन्हीतील आनंद अवर्णनीय असला तरी अनिश्चितताही तितकीच आहे. तरीही भाऊ काटदरेंनी वेळासमध्ये कासव महोत्सव रुजवला. आज कासवांचे गाव म्हणून वेळासची ओळख निर्माण झाली आहे. अन्य ठिकाणी अशाप्रकारे कासव महोत्सव होऊ शकतो. त्यातून पर्यटनाला गती मिळू शकते. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिकांनी वनखात्याला सोबत घेऊन छोट्या महोत्सवांची आखणी करणे आवश्यक आहे.

आकडे बोलके...

  • संवर्धनासाठी जिल्ह्यातील किनारे : १४

  • संवर्धन केंद्रांची संख्या : १५

  • २३७ घरट्यांमधील अंडी संरक्षितः १९ हजार ४४२

  • कासव पिल्लांना समुद्रात सोडलेः २४७

अशी वाटचाल ऑलिव्ह रिडले संवर्धनाची...

• २००३ मध्ये भाऊ काटदरेंनी सुरू केली चळवळ.

• कोकणातील ८० किनाऱ्यांवर येतात ऑलिव्ह रिडले.

• नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत कासव संवर्धन मोहीम.

• ५ कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर

• रत्नागिरी जिल्ह्यात १८ किनाऱ्यांवर संवर्धन.

संवर्धन कार्यपद्धतीत सुधारणा सुरू

कासव संवर्धन मोहिमेची कार्यपद्धत हळूहळू विकसित होत आहे. उन्हामुळे वाळू तापते. त्याच्या उबेवर अंडी उबतात. ही उब सर्व घरट्यांना समप्रमाणात मिळावी, म्हणून दोन घरट्यांमध्ये दोन फुटांचे अंतर निश्चित केले आहे. मादी कासव अंडी घालण्यापूर्वी खड्ड्यात काही द्रव पदार्थ सोडते. हा पदार्थ वाळूतील बुरशी, अतिसूक्ष्म विषाणूंपासून अंड्यांचे संरक्षण करतो. हे लक्षात आल्यावर अंड्यांबरोबर त्या घरट्यातील ओळी वाळूदेखील सोबत घेतली जाते. अजूनही अनेक गोष्टींमध्ये सुधारणांची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

या मुद्द्यावर होतेय संशोधन

कोकण किनारी मादी किती काळ असते?

एका विणीच्या हंगामात अधिकवेळा येते का?

पाऊस सुरू झाल्यानंतर प्रवासाची दिशा कोणती?

ऑलिव्ह रिडले कासवाचे संवर्धन आणि संरक्षणासाठी स्थानिकांसह पर्यटकांपर्यंत हा विषय पोहोचवला पाहिजे. त्यासाठी छोटे, छोटे कासव महोत्सव भरवले गेले पाहिजेत. लोकांच्या मनात या संदर्भात कुतहूल निर्माण झाले तर ते या चळवळीत सहभागी होतील.

- डॉ. सुरेशकुमार संशोधक, भारतीय वन्यजीव संस्था

ऑलिव्ह रिडले मादीची अंडी संरक्षित करून पिल्लांना समुद्रात सुरक्षित पोहाचवण्याची चळवळ आता कोकण किनारपट्टीवर रुजली आहे. दरवर्षी कासव संवर्धन केंद्रांची संख्या वाढत आहे. समुद्राकडे झेपावणारी पिल्ले पाहण्यासाठी पर्यटक वेळाससह अन्य समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करू लागले आहेत. या चळवळीला संशोधनाचा नवा आयामही मिळाला आहे. प्राथमिक प्रयोग म्हणून वेळास, आंजर्ले येथील प्रत्येकी मादी कासवाला तसेच गुहागरमधील तीन मादी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्यात आला आहे. कासव संवर्धन मोहिमेचे हे महोत्सवरूपी वातावरण निर्सगाशी जवळीक वाढवणारे ठरत आहे.

-मयूरेश पाटणकर, गुहागर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT