कोकण

कोकणात दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

वेळास : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात मंडणगड (Mandangad)तालुक्यातील शेवटचं टोक!तीन बाजूने डोंगरांनी वेढलेल्या आणि एक चतुर्थांश भागात समुद्र किनाऱ्याने वेढलेले हे गाव आपल्या कुशीत अनेक ऐतिहासिक गुपित लपवून बसले आहे. ऐतिहासिक हिमतगड (Himmatgad)किल्ल्याच्या बाजूला बाणकोट जवळून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या खाडीच्या दक्षिण तीरावर वसलेले हे गाव. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले वेळास काही दशकांपुर्वी फारसे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. गेल्या दशकभरापासून वेळास जगाच्या नकाशावर येत आहे. ते तिथे येणाऱ्या ऑलिव्ह रिडले (olive ridley turtles) या दुर्मिळ कासवांमुळेच. आज वेळासची ओळख ' कासवांचे गाव ' अशीच झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात वेळास गाव आहे.(olive-ridley-turtles-velas-beach-of-ratnagiri-mandangad-egg-process-turtle-breeding-period-kokan-news)

या महिन्यात असतो कासव सिझन

फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात इथला समुद्रकिनारा हा स्थानिक व पर्यटकांनी गजबजून जातो. याचे कारण या किनाऱ्यावर येणारी कासवे आहेत. वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर पुर्वीपासून विणीच्या हंगामात कासवाची माद्या अंडी घालायला दरवर्षी येतात. दशकभरापुर्वी ही कासवं आणि त्यांची घरटी याबद्दल फारशी माहिती कोणाला नव्हती. किनाऱ्यावर फिरताना अधेमधे ही कासवं त्यांना दिसायची. पण त्याला फारसे महत्व कधी दिले नाही. कासवांचे महत्व, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन कशासाठी करायला हवे याबाबतची पुरेशी जाण त्यांना नव्हती. मानवी शिकारांच्या तावडीतून सुटलेली अंडी आणि कासवे नंतर अन्नसाखळीतील कोल्हे, कुत्रे, समुद्री पक्षी, जाळे यांच्या तावडीत सापडत. काही नशीबवान पिल्ले अंड्यातून सुखरुप बाहेर येऊन पाण्यापर्यंत पोचत त्यांच्यामधल्या दीर्घायुषी होण्याचे भाग्य हजारामधील एखाद्याच पिल्लाला मिळत असे.

कासव संवर्धनाची सुरूवात

वेळास किनारी मोठ्या प्रमाणात कासवे प्रजाननासाठी नियमीतपणे येतात याची सर्वप्रथम नोंद घेतली ती चिपळूणच्या सह्याद्री नेचर कन्झ्रेवेशन या संस्थेने. वर्ष २००२ पासून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने या कासवांच्या संवर्धनासाठी संघटित स्वरुपात आणि शास्त्रीय पध्दतीने काम सुरु केले. या संस्थेचे कार्यकर्ते, वेळासचे गावकरी आणि वन खात्याचे अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून वेळास कासव संवर्धनाचा कार्यक्रम सुरु झाला. सुमारे दहा-अकरा वर्ष संवर्धनाचे काम केल्यानंतर ही जबाबदारी आज सह्याद्रीने वेळासच्या ग्रामस्थांकडे सोपवली. आज वेळास गावात ग्रामपंचायत, वन्य संवर्धन समिती आणि निर्मल सागर तट या तीन संस्था एकत्र मिळून कासव संवर्धनाचे काम करतात. सुरवातीला वेळास गावचेच रहिवासी मोहन उपाध्ये आणि त्यांचे सहकारी हे काम करत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हेमंत सालदूरकर आणि इतर ग्रामस्थ संवर्धनाची धुरा वाहत आहेत.

कासवांच्या प्रजननाचा काळ

साधारणतः नोव्हेंबर ते मार्च हा काळ या कासवांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर येते. बहुतेक वेळेला ही मादी मध्यरात्री किनाऱ्यावर येते. भरतीची वेळ या कासवांना सोयीची असते. भरती ओहोटीची गणिते जुळवुनच या माद्या किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावर आल्यानंतर पाण्यापासून अंदाजे पन्नास ते ऐंशी मीटर अंतरावर सुमारे दीड ते अडीच फूट खोल खड्डा करुन मादी अंडी घालते. या खड्डयावर पुन्हा आपल्या वल्ह्यासारख्या पायांनी रेती लोटून ही मादी पुन्हा समुद्रात निघून जाते कधीही न परतण्यासाठी. अंडी घालून कासवे समुद्रात परत जाताना रेतीवर एक वैशिष्ट्यपुर्ण नक्षी रेखाटून जातात. या माद्या अंडी घालून समुद्रात परत गेल्या की कासवांच्या संवर्धनाचे काम सुरु होते. नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते किनाऱ्यावर येतात. रात्री कासवानी घरटे करुन अंडी घातली की दोन ते तीन तासाच्या कालावधीतच ही घरटी शोधून त्यामधील अंडी ही सुरक्षित ठिकाणी हलवावी लागतात. कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या एक विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत ही घरटी शोधावी लागतात.

असे केले जाते स्थलांतर

घरटे सापडल्यानंतर त्या घरट्याचा आकार, त्यांची खोली, लांबी याच्या सविस्तर नोंदी घेतल्या जातात. त्यानंतर त्या घरट्यातल्या अंड्याची नोंद केली जाते. नंतर ही अंडी हलक्‍या हाताने कासव संवर्धन केंद्रात आणली जातात. तिथे पुन्हा तेवढ्याचा खोलीचा खड्डा करुन त्यात ही अंडी व्यवस्थित पुरली जातात. अंडी पुरल्यानंतर त्या खड्यावर घरटे सापडले तो दिवस आणि तारीख लिहीली जाते. तसेच अंदाजे अंड्यातून पिल्ले कधी बाहेर येतील याचा दिनांकही लिहीला जातो. कासवाची मादी जेव्हा अंडी घालते तेव्हा ती त्या अंड्याभोवताली एक विशिष्ट प्रकारच्या स्त्राव त्या घरट्यात आणि रेतीत सोडत असते. त्या स्त्रावामुळे अंड्यांचे बुरशीपासून रक्षण होते. त्यामुळे अंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना मुळ घरट्यातील हा स्त्रावमिश्रीत मातीही हलवावी लागते.

जेणेकरुन अंड्याना नैसर्गिक संरक्षण मिळेल.

अंड्यांची संख्या अधिक असली की, पिल्ले बाहेर येण्याच्या वेळी कासव महोत्सवाचे आयोजन केले जाते. सकाळ संध्याकाळ येथे येणारे पर्यटक कासव बघण्यासाठी नक्कीच उत्सुक असतात. पिल्ले समुद्रात सोडत असताना ती बघण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडते. या दरम्यान निवास व भोजन व्यवस्थेतून गावकऱ्यांसाठी रोजगाराची उपलब्धी होते. त्यातून आर्थिक उलाढाल झाल्याने उपजीविकेला मदत होते.मेलेले जलचर, अमर्याद वाढलेल्या पाणवनस्पती खाऊन ही कासवे सागरतळ स्वच्छ ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम करतात.

कासवाचे शास्त्रीय नाव- Lepidochelys Olivacea

वयोमर्यादा -५० वर्षे

नराचे वजन ४० किलोपर्यंत तर मादीचे वजन ४५ किलोपर्यंत

लांबी- २ फूट

विणीच्या हंगामात मादी ८० ते १७० अंडी एकावेळेस घालते.

अंडी उबण्याचा कालावधी ४५ ते ५५ दिवसांचा असतो.

नवजात पिल्लाचे वजन १५ ते २५ ग्रॅम इतके असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT