one corona positive patients found in mandangad nagar panchayat but 18 reports are pending of other employees 
कोकण

मंडणगड नगरपंचायतीत कोरोनाचा शिरकाव

सचिन माळी

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीचा सफाई कर्मचारी कोरोना संसर्गीत असल्याचे निदान झाले. त्यामुळे कोरोनाने आता नगरपंचायतीत शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. या कर्मचाऱ्याची तब्येत बिघडल्याने त्याने आरोग्य विभागाकडून तपासणी करुन घेतली. यावेळी घेण्यात आलेल्या अँटीजेन चाचणीत तो कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले होते.

मंडणगड नगरपंचायतीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने, भितीचे वातावरण आहे. मंगळवार (८) सप्टेंबरला नगरपंचायतीच्या एकूण 18 कर्मचाऱ्यांचे स्वॅब आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले आहेत. या अहवालाची कर्मचारी प्रतिक्षा करत आहे. सुरक्षेच्या कारणामुळे बुधवार (9) सप्टेंबर 2020 रोजी नगरपंचायत व्यापारी संकुलातील नगरंपचायतीचे कार्यालयीन कामावर याचा परिणाम जाणवला. मात्र प्रशासकीय कामकाज सुरू होते. 

मागील दोन दिवसात मंडणगड शहरात दोन नवीन कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. कोरोना विषाणू संसर्गाने मंडणगड शहराचे बाजारपेठेतही शिरकाव केला आहे. बाजारपेठीशी संबंधीत रुग्ण सापडल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अँटीजेन चाचणीची सोय तालुक्यात उपलब्ध झाल्याने कोरोना संसर्ग झाला आहे की नाही याचा अहवात तात्काळ कळत असला, तरीही तालुक्यात कोरोना चाचण्या वाढवाव्यात अथवा नाही या विषयी मतमतातंरे सुरु आहेत. 

अधिकाधीक कोरोना चाचण्या, कोरोनाबाधीतांवर उपचार व संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जागरूकता करणे हे स्थानिकांच्या अजून पचनी पडलेली नाही. दरम्यान गेल्या दोन दिवसात, दोन रुग्ण सापडले तरी नगरंचायतीकडून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरिता कोणतेही विशेष पावले उचली गेल्याचे दिसून आलेले नाही.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT