one dead in accident at sawantwadi 
कोकण

नदीवर निघालेल्या माऊलीवर मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ 

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - ती माऊली नेहमीप्रमाणे आज सकाळी कपडे धुण्यासाठी नदीवर निघाली होती आणि घरापासून थोड्याच अंतरावर पायवाटेवर तिच्या मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ तिच्यावर आली. तिने फोडलेल्या हंबरड्याने वस्तीवरील लोक धावून आले. कलंबिस्त येथे ही घटना घडली. रोहन भगवान पास्ते (वय 25) असे तिच्या मुलाचे नाव आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी, रोहन गोव्यात एका खासगी कंपनीत कामाला होता. तो, सुटीनिमित्त अधून मधून घरी येत असे. रोहनला दोन-तीन दिवस अस्वस्थ वाटत असल्याने शनिवार व रविवार सुटीच्या निमित्ताने आराम करण्यासाठी काल दुपारी गोवा येथून आपल्या घरी येण्यासाठी निघाला होता. सावंतवाडी-शिरशींगे बसमधून तो कलंबिस्त येथे उतरला. तेथून आपल्या घरी पायी चालत जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. उशिरापर्यंत ही घटना कोणाच्या निदर्शनास आली नाही. 

आज सकाळी रोहनची आई कपडे धुण्यासाठी येथून नदीकाठी जात असताना तिला पायवाटेने शेजारी कोणी तरी पडलेला दिसून आले. तिने जवळ जाऊन पाहिले असता तो मृतदेह रोहनचा असल्याचे तिच्या लक्षात आले आणि हा प्रकार उघड झाला. रोहनची ओळख पटल्यावर तिने तिथेच हंबरडा भोडला. यावेळी स्थानिक लोक तिथे धाऊन आले. गावात येऊन घरी पोहचू न शकलेल्या रोहनच्या अचानक जाण्याने पास्ते कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. येथील पोलिस ठाण्यात मृत रोहनचे काका प्रकाश न्हानू पास्ते यांनी वर्दी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT