Accident on Mumbai-Goa Highway esakal
कोकण

Road Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कार दुभाजकाला धडकून एक ठार, पत्नी-मुलीसह तिघे जखमी

अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने दरवाजाच्या काचा तोडून जखमींना बाहेर काढले.

सकाळ डिजिटल टीम

हुंबरट येथील उड्डाणपुलावर आल्‍यानंतर मोटार दुभाजकावर आदळली. अपघातात चालक शेट्टी जागीच ठार झाले.

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) हुंबरट येथे काल (गुरुवार) उड्डाणपुलावरील दुभाजकाला मुंबई ते गोवा भरधाव वेगाने जाणारी मोटार आदळली. यात चालकाचा जागीच मृत्‍यू झाला. प्रवीण सुंदर शेट्टी (वय ४०, रा. घाटकोपर, मुंबई) असे त्याचे नाव आहे. अपघातात अन्य तिघे जखमी झाले. आज सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला.

मुंबई-घाटकोपर येथून शेट्टी कुटुंबीय कोल्‍हापूर आणि तेथून गोवा असे पर्यटनासाठी मोटार (एम.एच. ०३ डी.जी. ७८९०) तून निघाले होते. हुंबरट येथील उड्डाणपुलावर आल्‍यानंतर मोटार दुभाजकावर आदळली. अपघातात चालक शेट्टी जागीच ठार झाले. शेजारी बसलेली पत्‍नी काव्यश्री प्रवीण शेट्टी (३५), मुलगी आर्वी (९) आणि मागील सीटवर बसलेले सिद्धेश भाऊसाहेब सटाले (३०, सर्व रा. घाटकोपर, मुंबई) यांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने दरवाजाच्या काचा तोडून जखमींना बाहेर काढले आणि कणकवली रुग्‍णालयात पाठविले. कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासह वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. काव्यश्री शेट्टी यांना गंभीर दुखापत झाली.

त्‍यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची मुलगी आर्वी हिच्या हाताला दुखापत झाली. सिद्धेश सटाले यांनी वर्दी दिली. सटाले यांनी कोल्‍हापूर ते गगनबावडापर्यत मोटार चालविली होती. त्यानंतर शेट्टी चालवत होते. हुंबरट येथे आल्‍यानंतर त्‍यांना डुलकी लागल्याने अपघात झाल्‍याची माहिती सटाले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT