One out of six patients has already died in Sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात त्या सहापैकी  एका रूग्णाचा आधीच झाला होता मृत्यू... 

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात आज सापडलेल्या सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांपैकी एका महिला रूग्णाचा याआधीच मृत्यू झाला आहे. देवगड तालुक्यातील टेंबवली येथील ती कोरोना बाधीत 79 वर्षीय महिला असून  ती 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्यादिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता.  23 मे  रोजी तिचा मृत्यू झाला होता. तिचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉजिटीव्ह आला आहे. तिला उच्च रक्तदाब व जुनाट श्वसनाचा आजार होता. 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे 

कणकवली तालुक्यातील बावशी येथील एक, कुडाळ तालुक्यातील कवठी येथील एक, देवगड तालुक्यातील वाडा येथील एक, वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील एक आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील एक आणि देवगड तालुक्यातील टेंबवली येतील मृत्यू झालेल्या महिलेचा एक असे एकूण 6 अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 30 इतकी झाली आहे. या पैकी 7 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्याने कोरोना बाधीत आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CID Raid Kolhapur : मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

Pan Card : तुमचा PAN नंबर रँडम नाही! प्रत्येक अक्षरात लपले आहे तुमचं गुपित; जाणून घ्या काय अर्थ आहे

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार श्रेयस तळपदेची एंट्री ? "लोक लक्ष वेधून घेण्यासाठी.."

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची सभा होणार, चार पक्षांनी मागितलेल्या तारखा; अखेर BMCने काढला तोडगा

SCROLL FOR NEXT