online digital satbara received for people 100 percent working complete in rajapur ratnagiri 
कोकण

आता लवकरच मिळणार ऑनलाइन पद्धतीने डिजिटल सहीचे सातबारा

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : जिल्ह्यातील सर्वाधिक सातबारा संख्या असणाऱ्या राजापूर तालुक्‍याने सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे शेतकऱ्यांसह तालुकावासीयांना आता लवकरच ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा कुठेही उपलब्ध होणार आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग असनाही प्रांताधिकारी प्रवीण खाडे आणि तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महसूल विभागाने नव्या वर्षाच्या आरंभाला साधलेल्या सुखद कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 

तलाठ्यांशी न होणारा संपर्क, वारंवार डाऊन असलेला सर्व्हर आदी विविध कारणांमुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये वारंवार खेटे मारावे लागतात. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने 2013 पासून महसूल व वनविभाग अधिकारी अभिलेखातील नोंदी व त्यांच्या कार्यपद्धतीचे संगणकीकरण ई फेरफार कार्यकम संपूर्ण राज्यात हाती घेतला. सातबारा ऑनलाइन करण्याचे काम हाती घेण्यात आले. अनेक ऑनलाइन सातबारामध्ये अनेक त्रुटी राहिल्याने जमीन मालकांना असे चुकीचे सातबारे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे चुका सुधारण्यासाठी पुन्हा नव्याने सातबारा ऑनलाइनचे काम हाती घेतले. 

237 गावे, 12 मंडल आणि 69 सजा

237 महसुली गावे आणि त्यामध्ये 12 मंडल आणि 69 सजांचा समावेश असलेल्या तालुक्‍यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक खातेदार आहेत. 3 लाख 18 हजार 949 सातबारा उताऱ्यांचे शंभर टक्के ऑनलाइनचे काम पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार वराळे यांनी दिली. सातबारा उतारा ऑनलाइन झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

दृष्टिक्षेपात राजापूरचे सातबारा उतारे

  • एकूण सातबारा उतारे ः 318949 
  • सर्वात जास्त सातबारा संख्या असणारे मंडल ः नाटे (49216) 
  • सर्वात जास्त सातबारा संख्या असणारे सजा ः राऊतवाडी (17623) 
  • सर्वात जास्त सातबारा संख्या असणारे महसूल गाव ः राऊतवाडी ः (7746) 
  • डीएसडीचे काम प्रथम पूर्ण झालेले गाव ः जांभारी (64) 
  • डीएसडीचे काम प्रथम पूर्ण झालेले सजा ः सागवे (4408) 
  • डीएसडीचे काम प्रथम पूर्ण झालेले मंडल ः कुंभवडे (28810) 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT