online OPD start for patients in oros sindhudurg help of i sanjeevani policy 
कोकण

आता किरकोळ आजारासाठी डॉक्‍टरकडे जावे लागणार नाही ; ऑनलाईन ओपीडीमुळे रुग्णांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : हॅलो... डॉक्‍टर, अंग गरम झालंय... घसा दुखतोय... खोकला आहे... असा संवाद दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर आणि जिल्ह्यातील रुग्ण यांच्यात सुरू झाला आहे. यासाठी ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना किरकोळ आजारासाठी डॉक्‍टरकडे जावे लागत नाही.

डॉक्‍टर नंबर डायल केल्यावर रुग्णांना मोबाईलवर उपचार सांगत आहेत. आतापर्यंत या सेवेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८८ रुग्णांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना ‘ई-संजीवनी’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी केले आहे.

रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात रांगेत उभे राहावे लागू नये, ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा व तालुकास्तरावर येण्यासाठी लागणारा आर्थिक भुर्दंड कमी व्हावा, यासाठी शासनाने ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केली आहे. केरळ, तामिळनाडू, राजस्थान आणि आता महाराष्ट्र राज्यात ही सेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यात मे २०२० पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात प्रत्यक्षात ही योजना नोव्हेंबर २०२० नंतर सुरू करण्यात आली आहे. याबाबत डॉक्‍टरांना आवश्‍यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ई-संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन असल्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन असणे आवश्‍यक आहे. ही सेवा www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून लॅपटॉप व संगणकावरून घेता येते. सकाळी ९:३० ते दुपारी १:३० तर दुपारी ३ ते ५ यावेळी उपलब्ध असणार आहे. रविवारी ही सुविधा उपलब्ध नसणार. सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना अँड्रॉईड मोबाईलद्‌वारे ई-संजीवनी ओपीडी या संकेतस्थळावर किंवा संजीवनी ओपीडी ॲपद्वारे नोंदणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेता येतो.

ई-संजीवनी ॲपवर टेलिकन्सल्टेशनद्वारे वैद्यकीय अधिकारी गरजू रुग्णांना वैद्यकीय सल्ला देतात. डॉक्‍टरांशी चर्चा झाल्यानंतर रुग्णांना ई-प्रिस्क्रिप्शनही दिले जात आहे. ही सुविधा जिल्ह्यात सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८८ रूग्णांनी लाभ घेतला आहे. ही सुविधा विनामूल्य उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या ई-संजीवनी ओपीडी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

अशी आहे सेवा

नोंदणी करुन टोकन घेणे-मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ओटीपी येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. लॉगईनसाठी एसएमएसद्‌वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते. वेटिंग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्‍टिव्हेट) होते. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्‍टरांशी चर्चा केली जाते. चर्चेनंतर लगेच ई- प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते.

नेट कनेक्‍टिव्हिटी कमी प्रतिसाद

ई-संजीवनी ओपीडी ही शासनाची चांगली सुविधा आहे. यात रुग्ण डॉक्‍टरांकडे येत नाही तर डॉक्‍टर स्वतः रुग्णांपर्यंत ऑनलाईन जातात. त्यामुळे रुग्णाचा वेळ व खर्च वाचतो; मात्र जिल्ह्यात दुर्गम भागात नेट कनेक्‍टिव्हिटी चांगली नाही. आणि या सेवेसाठी नेट कनेक्‍टिव्हिटी चांगली असावी लागते. त्यामुळे या सेवेचा लाभ रुग्णांना घेताना नेट कनेक्‍टिव्हिटीची अडसर निर्माण होत आहे. जिल्ह्यात चांगली नेट कनेक्‍टिव्हिटी उपलब्ध झाल्यास रुग्णांना या सेवेचा लाभ होवू शकतो, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT