only half of schools are open in ratnagiri 7000 students present in this schools in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत निम्म्याच शाळा सुरू ; फक्त ७ हजार विद्यार्थ्यांनी लावली हजेरी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई, पुण्यात शाळा सुरू करण्यासाठी थोडा कालावधी दिला असताना रत्नागिरीत शासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी ४५४ पैकी २०४ शाळांचे प्रत्यक्ष शिकवण्याचे काम सुरू झाले. ८३ हजार ६९ पैकी अवघे ७,९१७ विद्यार्थीच शाळेत हजर झाले. काही शाळांमध्ये तर एकच विद्यार्थी संमतिपत्र घेऊन आला होता. कोरोनाच्या भीतीमुळे पालक धोका पत्करण्यास तयार नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले.

शासनाच्या आदेशानुसार नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी गेले काही दिवस प्रशासनाकडून तयारी सुरु झाली होती. सोमवारी पहिल्या दिवशी काही शाळा नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात तर काही शाळा साडेदहा वाजता सुरू झाल्या. प्रवेशद्वारावर ऑक्‍सीमीटर आणि थर्मल गन घेऊन विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी शाळा व्यवस्थापन सज्ज होते. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत साडेनऊ टक्‍केच विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले होते. ज्या शिक्षकांनी कोरोना चाचणी केली होती, त्यांनी शाळेत हजेरी लावली. 

रत्नागिरी तालुक्‍यातील शाळांत सर्वांत कमी ८६ विद्यार्थी उपस्थित होते. तर सर्वाधिक विद्यार्थी गुहागरमध्ये १,६७२ आणि संगमेश्‍वरला १,६४८ उपस्थित होते. शहरी भागात शाळा सुरू होण्याचा कल कमी होता. जिल्ह्यात अध्यापन करणारे ४,२८१ शिक्षक असून त्यापैकी २,९३२ जणांच्या चाचण्या झाल्या. त्यातील ७ बाधित आढळले. यामध्ये संगमेश्‍वरात २, रत्नागिरीत ४ तर लांजा येथे १ रुग्ण आहे. १,३८४ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ९६० जणांची तपासणी झा ली असून २ जणं बाधित आढळले आहेत. त्यांच्यावर कोविड सेंटरवर उपचार सुरू आहेत.

तालुका            विद्यार्थी         शाळा
मंडणगड            ६१९              २४
दापोली               ५४७             ११
खेड                    ७३८            ३५
चिपळूण            १,२२९            ३२
गुहागर              १,६७२           २९
संगमेश्‍वर           १,६४८          २२
रत्नागिरी                 ८६           २९
लांजा                    ९१६           १३
राजापूर                 ४६२            ९
 

"विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमतिपत्रे आवश्‍यक असल्याचे शिक्षण सचिवांनी सांगितले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या निकषांचे पालन करत वर्ग सुरू झाले आहेत. याची प्रत्यक्ष पाहणी अधिकाऱ्यांनी केली."

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT