kokan
kokan sakal
कोकण

जादा दराला विरोध; दीड कोटींची बचत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पालिकेने नेमलेल्या अॅकोटक कन्सलटंट यांनी दिलेल्या अभिप्रायवरून पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या वाढीव २०.८७ टक्के एवजी ९.६५ टक्के दर देण्यास आजच्या तातडीच्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर देण्यात आली.

भाजपने याला विरोध करून हा विषय लावून धरला होता. त्याला शिवसेनेनेही पाठिंबा देत विरोध केल्याने गेल्या सभेत पालिकेवर आर्थिक भार पडणाऱ्या या ठरावाला विरोध झाला. आता ११ टक्के कमी केलेला दर मंजूर पान जादा दराला विरोध; दीड कोटींची बचत केल्याने दीड कोटी रुपयांचा पालिकेवरील बोजा कमी झाला आहे. त्यामुळे आता पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत होण्यास मार्ग मोकळा झाला आहे.

पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे अंदाजपत्र १४ कोटी २८ लाख ५४ हजार आहे. २०१९-२० मधील हे काम आहे. मात्र, कोरोनामुळे ते पुढे गेले. या कामाच्या दुसऱ्यांदा काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला. २ निविदा आल्या होत्या, त्यामधील स्पेकट्रम इन्फ्रास्ट्रक्चर यांना तांत्रिक लखोटा परिपूर्ण नसल्याने त्यांना वित्तीय लखोटा उघडण्यात आला नाही. दुसरे मक्तेदार निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर यांची अंदाजपत्रकीय दरापेक्षा २०.८७ टक्के वाढीव दराची निविदा प्राप्त झाली. यामुळे इमारतीचे अंदाजपत्रक १७ कोटीच्यावर जात होते. त्यामुळे ३ कोटीचा वाढीव बोजा पालिकेवरच पडणार होता. त्यामुळे सभागृहात भाजपने या वाढीव दराला विरोध केला. त्याचबरोबर सेनेचे गटनेते राजन शेट्ये यांनीही या ठरावाला विरोध दर्शविला.

शिवसेना, भाजप विरोधानंतर...

निर्माण कंपनीने ९.६५ टक्के दराने इमारतीचे काम करण्यास तयारी दर्शविल्यावर निर्णय घेण्यासाठी तातडीची विशेष सभा बोलावण्यात आली होती. विषयाचे वाचन झाल्यानंतर भाजपने या वाढीव दराला विरोध केला होता. त्यानंतर शिवसेनेनेही विरोध केल्याने कंपनी २० टक्के एवजी ९ टक्के दराने काम करण्यास तयार झाली. यामुळे पालिकेचे सुमारे दीड कोटी रुपये वाचले.

९.६५ टक्के दराने काम करणार

दरम्यान, पालिकेने नेमलेल्या अॅकोटक कन्सलटंट कंपनीने जास्तीत जास्त ९.६५ टक्के वाढीव दर देता येईल, असा सल्ला दिला होता. त्यापलीकडे वाढीव दर देता येणार नाही, असे एकमत झाले. तसे निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरला कळविण्यात आले. निर्माण कंपनीने माघार घेत ९.६५ टक्के दराने इमारतीचे काम करण्यास तयारी दर्शविली.

एक नजर..

इमारतीचे अंदाजपत्रः १४ कोटी २८ लाख ५४ हजार

वाढीव दराची निविदा प्राप्तः २०.८७ टक्के

अंदाजपत्रक जाणार होतेः १७ कोटींहून अधिक

निर्माण कंपनीने या दरात ठेवली कामाची तयारीः ९.६५ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT