Pachal Gram Panchayat Help Center For Farmers Ratnagiri Marathi News 
कोकण

खुषखबर ! पाचल ग्रामपंचायतीतर्फे शेतकऱ्यांसाठी 'हे' केंद्र 

सकाळवृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) - शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा आणि जास्त जमीन ओलिताखाली आणण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वा प्रबोधन करण्यासाठी पाचल ग्रामपंचायतीने कृषी वाचनालय आणि कृषी सल्ला केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांसाठी वाचनालय सुरू करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी पाचल पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. 

पाचल येथील कृषी मंडल कार्यालयामध्ये सुरू केलेल्या कृषी वाचनालयाचा आरंभ कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच अपेक्षा मासये यांच्या हस्ते झाले. या वेळी पंचायत समितीच्या सभापती विशाखा लाड, सागर पाटील, किशोर नारकर, विनायक सक्रे, संतोष मदने, आदी उपस्थित होते. सातत्याने बदलते हवामान, लहरी पाऊस, त्यातून मिळणारे कमी उत्पन्न आदींमुळे शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला आहे.

शेती उत्पन्नाचे शाश्‍वत स्रोत असूनही गेल्या काही वर्षामध्ये पडीक शेतीक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. शेतीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व्हावा, या उद्देशाने कृषी वाचनालय सुरू केले आहे. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कृषी सहसंचालक पाटील यांनी विशेष कौतुक करताना या वाचनालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह लोकांचे प्रबोधन होऊन शेतकऱ्यांची पुन्हा एकदा शेताकडे पावले फिरून शिवार निश्‍चितच गजबजेल असा विश्‍वास व्यक्त केला. 

कृषी सल्ला केंद्र उभारणीही 

कृषीसंबधित लागणारी पुस्तके पाचल ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये कृषी विषयक शासनाच्या विविध योजनांसह विविध प्रकारच्या लागवडीसह त्याची निगा कशी राखावी, सिंचन कसे करावे, कमी श्रमातून जादा उत्पन्न कसे मिळवायचे, जादा उत्पन्न मिळवून देणारी पिके कोणती आदी माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. कृषी सल्ला केंद्र उभारणीसाठी लागणारी साहित्यसामुग्री, संगणक, प्रिंटर आदी साहित्यही ग्रामपंचायतीने दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: महाराष्ट्राला पाऊस पुन्हा झोडपणार, मुंबईसह १२ जिल्ह्यांत धो-धो कोसळणार; यलो अलर्ट जारी

INDW vs SA W World Cup Final: टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार? एक डाव आपल्यावरच पडू शकतो भारी, दक्षिण आफ्रिकेला...

Shocking News : चौथीच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन संपवलं जीवन; शाळेवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

Samruddhi Express Way : एकाच कुटुंबातील २३ जण निघाले होते शेगावला, इगतपुरी बोगद्यात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Nashik Cyber Fraud : शेअर ट्रेडिंगचा अनुभव असूनही फसले! निवृत्त अधिकाऱ्याने २.२४ कोटींची आयुष्यभराची कमाई गमावली

SCROLL FOR NEXT