कणकवली ( सिंधुदुर्ग ) - कोरोनामुळे वाहतुकीवर झालेल्या परिणामांचा काही अंशी भातबियाणे व खतांच्या उपलब्धतेवरही परिणाम होताना दिसत आहे. येथील खरेदी -विक्री संघात कृषी उद्योग, आरसीएफचे खत उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. तरीही शेतकऱ्यांना खत, भातबियाणे उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. सुमारे 25 प्रकारची भातबियाणी उपलब्ध झालेली असून महाबीजची भातबियाणी लवकरच उपलब्ध होतील, अशी माहिती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई व व्यवस्थापक अनिल सुखटणकर यांनी दिली.
संघाच्या माध्यमातून महाबीजचे 118 क्विंटल व इतर विविध कंपन्यांचे मिळून सुमारे एक हजार क्विंटल भात बियाणे मागविले आहे. यापैकी शुभांगी, सोनम, चिंटू, सुप्रिम सोना, तृप्ती, सारथी, 6464, दप्तरी अमानी, साईराम, पार्वती, पूनम, मोती होल्ड, कर्जत 2, कर्जत 9, रत्नागिरी 7, रत्नागिरी 8, कोमल, प्रसन्ना, रूचिका, जया, सिल्की, अवनी, धनदेव, श्रीराम अशी सुधारीत संकरीत, संशोधीत भातबियाणी उपलब्ध झाली आहेत. महाबीजची भातबियाणी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरील वाहतुक समस्येमुळे येण्यास विलंब होत आहे. खरेदी विक्री संघातर्फे झुआरी, कृषीउद्योग, आरसीएफ अशा कंपन्यांकडे खतांची मागणी नोंदविलेली आहे. आतापर्यंत झुआरीकडून 200 टन खत उपलब्ध झाले आहे. आरसीएफकडून 60 टन आले आहे. आसीएफकडे 270 टन युरिया व 110 टन सुफलाची मागणी केलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.