panchayat samiti is working under the women mayor in ratnagiri 
कोकण

पन्नास वर्षांत पहिल्यांदाच इतिहास ; पंचायत समितीत आलं महिलाराज

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तालुक्‍यात या वेळी सभापती आणि उपसभापती अशी दोन्ही पदे महिला सदस्य भूषवीत आहेत. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी महिलाराज गेल्या सुमारे पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच आले आहे. सद्यःस्थितीमध्ये पंचायत समितीचे सभापतीपद शिवसेनेच्या सदस्य प्रमिला कानडे तर उपसभापतीपद उन्नती वाघरे भूषवीत आहेत.   

अरबी समुद्रापासून थेट घाटमाथ्याच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्‍यामध्ये २३८ गावांचा समावेश आहे. ब्रिटिशकालीन इतिहासाची पार्श्‍वभूमी लाभलेल्या राजापूर तालुक्‍याचा कारभार पाहण्यासाठी पंचायत समितीची निर्मिती झाली. त्यापूर्वी सुमारे पंधरा वर्षे तालुक्‍याचा कारभार लोकल बोर्डातर्फे चालविला गेल्याची माहिती काही बुजुर्गांकडून 
दिली जाते. 

पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापतीपद अशी दोन्ही पदे एकाचवेळी दोन पुरुषांनी भूषविली आहेत तर, काहीवेळा पुरुष आणि महिला सदस्यांनी भूषविली. मात्र, एकाचवेळी दोन्ही प्रमुख पदे महिलांनी भूषविलेली नव्हती. मात्र, हा दुर्मिळ योग या वेळी जुळून आला आहे. पंचायत समितीत बारा सदस्य
शिवसेनेचे आहेत. शिवसेना पक्षांतर्गत झालेल्या निर्णयानुसार सभापती पदासाठी केळवली गणाच्या सदस्य कानडे तर उपसभापतीपदी साखरीनाटे गणाच्या वाघरे यांना संधी 
मिळाली आहे. 

आजपर्यंतचे उपसभापती

श्रीराम शेवडे, भिकाजी चव्हाण, कृष्णाजी प्रभूदेसाई, इब्राहिम बलबले, यशवंत बाणे, वासुदेव मासये,  प्रकाश गुरव, देवजी फणसे, विजय राठोड, दिप्ती चव्हाण, देवचंद्र मांजरेकर, नारायण मोरे, शीतल हर्डीकर, सुहास वारीक, देवचंद मांजरेकर, विनोद शिंदे, प्रभात पाध्ये, भाग्यश्री लाड, उमेश पराडकर, अश्‍विनी शिवणेकर, प्रशांत गावकर, प्रकाश गुरव, उन्नती वाघरे.

आजपर्यंत यांनी सभापतीपद भूषविले

वामन सप्रे, भिकाजी चव्हाण, सदानंद प्रभूदेसाई, सदानंद चव्हाण, उमेश प्रभूदेसाई, प्रतिभा गुरव, प्रकाश कुवळेकर, सीताराम जाधव, देवजी फणसे, दत्ताराम गोरूले, रघुनाथ जोशी, हरिश्‍चंद्र गुरव, शीतल हर्डीकर, कमलाकर कदम, सुजाता ठुकरूल, देवचंद मांजरेकर, चेतना पारकर, पल्लवी तळेकर, सोनम बावकर, सुभाष गुरव, अश्‍विनी शिवणेकर, अभिजित तेली, विशाखा लाड, प्रकाश गुरव, प्रमिला कानडे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : बदलापूरमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीत सात दुकानं फोडली

SCROLL FOR NEXT