passport name other person located in london before 10 years in dapoli ratnagiri 
कोकण

तब्बल 10 वर्षांनी पितळ उघडे; दुसऱ्या नावाने पासपोर्ट काढून लंडन वाऱ्या

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : स्वत:च्या नावाने पासपोर्ट न काढता, दुसऱ्या नावाने पासपोर्ट काढून गेली दहा वर्षे या पासपोर्टचा उपयोग करून लंडन ते भारत असा प्रवास करणाऱ्या दापोली तालुक्‍यातील चिखलगाव येथील संशयितावर दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात पासपोर्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदानंद गणपत चाफे असे संशयिताचे नाव आहे. तो सध्या लंडन येथेच असल्याने त्याला दाभोळ पोलिस अटक कशी करणार, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

याबाबत दाभोळ सागरी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्‍यातील चिखलगाव येथील सदानंद गणपत चाफे यांचा पासपोर्ट (क्रमांक-युके-२०७४३२७७६३५२०) लंडन येथून हा नूतनीकरणाच्या चौकशीसाठी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात आला होता. या पासपोर्टवर सुधीर गुणाजी चाफेकर असे नाव होते; मात्र पोलिसांनी चिखलगाव येथे जाऊन या सुधीर चाफेकर या नावाच्या व्यक्‍तीची चौकशी केली असता, त्यांना या नावाची व्यक्‍ती गावात कोणीच राहात नाही; मात्र सदानंद गणपत चाफे ही व्यक्‍ती चिखलगाव येथून नोकरीनिमित्त लंडन येथे गेली असल्याचे सांगण्यात आले. ८ एप्रिल २०११ ते यावर्षीपर्यत ते लंडन येथून गावी चिखलगाव येथे येत असल्याची माहिती या पासपोर्टवरून पोलिसांना मिळाली. त्यामुळे सदानंद गणपत चाफे यांनी सुधीर गुणाजी चाफेकर या बनावट नावाने पासपोर्ट काढून स्वत:च्या फायद्यासाठी, अप्रामाणिकपणे त्याचा उपयोग करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल सिद्धार्थ गणपत गायकवाड यांनी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

फसवणुकीचा गुन्हा

संशयित सदानंद गणपत चाफे यांच्या विरोधात फसवणूक, इंडियन पासपोर्ट कायदा १९६७ चे कलम १२(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून, अधिक तपास उपनिरीक्षक गणेश सावर्डेकर अधिक तपास करत आहेत.

दृष्टिक्षेपात..

  • पासपोर्ट नूतनीकरणाच्या चौकशीसाठी आला
  • चाफे नावाची व्यक्‍ती गावात राहात नसल्याचे उघड
  • चिखलगाव येथून नोकरीनिमित्त लंडन गेल्याची माहिती
  • ८ एप्रिल २०११ पासून चाफेंची लंडनवारी
  • सुधीर गुणाजी चाफेकर या बनावट नावाने पासपोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Maharashtra 2026 : मॉन्सून केरळमध्ये ४ दिवस आधीच पोहोचणार, पण महाराष्ट्रात कधी दाखल होणार? नवी अपडेट समोर

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू

Maharashtra Electricity: थेट ग्राहकांना शॉक! महावितरणची वीजगळती १५% वर; ८०० कोटींचा थेट भुर्दंड ग्राहकांवर..

Bharat Forecast System : हवामानाच्या संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला मिळालं 'ब्रह्मास्त्र'; IITM च्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे आता काळजी मिटली, पाहा काय आहे नवीन प्रणाली?

Maharashtra Politics: आमदार होईपर्यंत अनवाणी’ संकल्प पूर्ण; नवसपूर्तीप्रसंगी नेता अन् कार्यकर्त्याच्या डोळ्यांत आश्रू, शिर्डीत निष्ठेचे अनोखे दर्शन..

SCROLL FOR NEXT