Pension fund outreach services due to lockdown in mandangad kokan marathi news 
कोकण

मंडणगडात पोस्टमन काका बनले वृद्धांचे श्रावणबाळ....

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महारोगाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

नागरिकांची आर्थिक कुचंबना झाली असून अशा परिस्थीतीत ग्रामीण भागातील निराधार लोकांसाठी पोस्ट कर्मचाऱ्यांनी घरपोच सेवा दिल्याने पोस्टमन हे निराधार व वृद्धांचे खऱ्या अर्थाने श्रावणबाळ बनले आहेत. मंडणगड तालुक्यात १७३५ लाभार्थ्यांपैकी सुमारे १ हजार लाभार्थ्यांना ही सेवा घरपोच देण्यात आली आहे. त्यासाठी मंडणगड तालुक्यातील ४६ कर्मचारी उन्हातान्हातून परिश्रम घेत आहेत.

लॉकडाउनमुळे पेंशन निधी घरपोच सेवा

सध्या सर्वत्र कोविड १९ विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आला आहे. या काळात रेल्वे व एसटी सेवा बंद झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका पोस्ट खात्याला बसला आहे. या कालावधीतसुद्धा अत्यावश्यक सेवा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील ६५० पोस्ट ऑफिस चालू आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये डाक विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजना व इतर योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या घरोघरी जावून पोस्टमन वितरित करीत आहेत. यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलत असून पोस्टमनच्या रूपाने आपला श्रावणबाळ घरी आल्याच्या भावना लाभार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

कर्मचाऱ्यांनी कसली कंबर

मंडणगड तालुक्यात १७३५ लाभार्थ्यांपैकी सुमारे १ हजार लाभार्थ्यांना ही सेवा घरपोच देण्यात आली आहे. त्यासाठी मंडणगड तालुक्यातील ४६ कर्मचारी उन्हातान्हातून परिश्रम घेत आहेत. मंडणगड, वेसवी, पंदेरी, लाटवण, पालवणी, मांदिवली केंद्रातील १७३५ लाभार्थ्यांचे संजय गांधी व श्रावणबाळ योजनांचे १६ लाख, ४२ हजार ८०० रुपयांचा निधी तहसिल कार्यालयातून पोस्ट खात्यात जमा झाला असून त्याचे वाटप सुरू आहे.

चेहऱ्यावर फुलविले समाधानाचे हास्य

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक द्वारे लोकांना घरपोच आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा दिली जात आहे. यामध्ये पैसे खात्यात जमा करणे, खात्यातून पैसे काढणे तसेच बँकेच्या इतर सुविधा देण्यात येत आहेत. महत्वाची सुविधा म्हणजे AEPS सुविधा यामध्ये कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यातील पैसे लोकांना घरबसल्या प्राप्त करून देण्यात येत आहेत. पोस्ट ऑफिसमधून राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


पोस्ट कार्यालयमार्फत राबविण्यात येणा-या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना घरोघरी पोहचवणे आमचे कर्तव्य आहे. माझे सर्व कर्मचारी त्या सर्व सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दापोली तसेच मंडणगड तहसील कार्यालयातील संबंधीत कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्यात आलेला असून आम्ही सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत.
- निलेश पोटसुरे, डाकघर निरीक्षक दापोली.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनाअंतर्गत देण्यात येणारी पेन्शन (निधी) हा लोकांना घरपोच दिला जातो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी करू नये, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू नये यासाठी घरोघरी जावून सेवा देत आहोत.
- अंकित खेरटकर, डाक सेवक मंडणगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

Sonali Kulkarni:'सोनाली कुलकर्णीकडून सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे कौतुक'; समाज माध्यमात शेअर केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT