Drowned in sea sakal
कोकण

Devgad News : पिंपरीतील चार तरुणी देवगड येथे समुद्रामध्ये बुडाल्या; एक अजूनही बेपत्ता

पिंपरी चिंचवड (पुणे) येथील सैनिक अ‍ॅकॅडमी या प्रशिक्षण केंद्रामधील येथे सहलीसाठी आलेले सहा उमेदवार समुद्रात बुडाले होते; त्यात चार तरुणींचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

देवगड, (जि. सिंधुदुर्ग) - पिंपरी चिंचवड (पुणे) येथील सैनिक अ‍ॅकॅडमी या प्रशिक्षण केंद्रामधील येथे सहलीसाठी आलेले सहा उमेदवार समुद्रात बुडाले होते; त्यात चार तरुणींचा मृत्यू झाला असून अन्य एकाची प्रकृती गंभीर आहे. अजूनही एकजण बेपत्ता आहे. हे प्रशिक्षणार्थी १९ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रेरणा रमेश डोंगरे (वय २१, घरकुल चिखली, पुणे), अंकिता राहुल गलाटे (वय २१, कृष्णानगर चिखली, पुणे), अनिषा नितीन पवळ (वय १९, चिखली ताम्हणेवस्ती, पुणे), पायल राजू बनसोडे (वय २१, घरकुल चिखली, पुणे) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत.

रामचंद्र घनश्याम डिचोलकर (वय २२, कणकवली) हा बेपत्ता आहे. आकाश सोमाजी तुपे (वय २२, रुपीनगर, पुणे) याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड (पुणे) परिसरातील सैनिक अ‍ॅकॅडमीमधील एकूण ३२ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक आणि त्यांचे अन्य नातेवाईक असे एकूण ३६ जण गुरुवारी (ता. ७) रात्री पुणे येथून सिंधुदुर्गात सहलीसाठी आले होते.

यामध्ये १५ तरुणींचा समावेश होता. हे सर्वजण शुक्रवारी (ता. ८) सकाळी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला पाहून सायंकाळच्या सुमारास कुणकेश्‍वर येथे मुक्कामासाठी आले. कुणकेश्‍वर येथे मुक्काम करून आज देवदर्शन आणि परिसर फिरून दुपारच्या सुमारास जेवण करून ते येथील पवनचक्की परिसरात आले. यातील सहा जण समुद्रात उतरले; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.

हा प्रकार किनाऱ्यावर असलेल्या इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. यानंतर मदत आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडणाऱ्या पाच जणांना पाण्याबाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. त्यांना रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले; मात्र त्यातील चार तरुणींचा मृत्यू झाला होता. एकावर उपचार सुरू होते. बेपत्ता असलेल्या रामचंद्र डिचोलकर याचा शोध सुरू होता.

सहल आखताना...

सध्या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या सहलींचे प्रमाण वाढले आहे. सहलीसाठी येणाऱ्या मुलांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. त्यामुळे शिक्षकांनी या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. देवगड येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही बाब प्रकर्षाने जाणवली. सिंधुदुर्गमधील काही समुद्रकिनारे जास्त धोकादायक आहेत आणि वारंवार एकाच ठिकाणी दुर्घटना घडतात.

ही ठिकाणे समुद्री भोवऱ्यांमुळे धोकादायक बनली आहेत. या ठिकाणांची माहिती पर्यटकांना व्हावी यासाठी तेथे फलक लावण्यात आले असून तेही खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या धोकादायक ठिकाणांची लोकांनी आधी माहिती घ्यावी, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली.

सहल ठरली जीवघेणी

सैनिक अ‍ॅकॅडमीमार्फत पोलिस भरतीपूर्व तयारीसाठी मैदानी प्रशिक्षण दिले जाते. येथे एकूण ५० प्रशिक्षणार्थी आहेत. यातील पंधरा महिला, १७ पुरुष असे मिळून ३२ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक आणि अन्य नातेवाईक असे एकूण ३६ जण सहलीसाठी आले होते. त्यातील चार तरुणींसह सहाजण पाण्यात बुडाले. एकजण बेपत्ता असून, एकाची प्रकृती स्थिर आहे.

पहिलीच मोठी दुर्घटना

देवगड समुद्रात एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक बुडाल्याची ही पहिलीच घटना होती. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रकिनारा गर्दीने फुलून गेला होता. स्थानिकांनी बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी मदतीचा हात दिला. येथील ग्रामीण रुग्णालयातही अनेकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT