Police send deputy elderly couple to Pune in a tweet kokan marathi news
Police send deputy elderly couple to Pune in a tweet kokan marathi news 
कोकण

एका ट्विटवर पोलीसांनी केली वृध्द दांपत्याची पुणेकडे रवानगी....

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.  याचाच फटका बसून संगमेश्वर तालुक्याच्या कोंड उमरे गावात  कोथरूड पुणे येथील एक दांपत्य अडकून पडले होते.  या वृध्द जोडप्याची गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक पत्रकारांनी  थेट रत्नागिरी पोलीसांना एक ट्विट करुन मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

 यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . प्रवीण मुंडे यांनी संगमेश्वरचे पोलीस निरिक्षक उदयकुमार झावरे यांना सूचना दिल्यानंतर काहीवेळातच पोलीस थेट कोंड उमरे गावात पोहचले आणि आवश्यक त्या परवानगीसह या वृध्द दांपत्याची पुणेकडे रवानगी करण्याची सोय केली. पोलीसांच्या या तत्परतेबद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सत्यवान विचारे यांनी पोलीस दलाला विशेष धन्यवाद दिले आहेत.

कोथरूड पुणे येथील अशोक विठ्ठल पवार ( ६९ ) आपल्या पत्नीसह आठ मार्चला होळीसाठी चालकाला घेऊन स्वतःच्या कारने संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे या गावी आले होते. सणानंतर ते परत कोथरूडला जाणार तोपर्यंत देशात कोरोनाच्या प्रसाराचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आणि पवार वृध्द दांपत्य गावच्या घरीच अडकून पडले . 

 अन् वृध्द दांपत्य गावच्या घरीच अडकले

अशोक विठ्ठल पवार यांना आणि पत्नीला तीव्र स्वरूपातील मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांनी सोबत  येतांना मर्यादित स्वरुपातील औषध साठा आणला होता. गावाकडचे घर अन्यवेळी बंद असल्याने घरात जीवनावश्यक वस्तूंचा साठाही नव्हता. अशातच येथे भ्रमणध्वनीची रेंज नसल्याने त्यांच्या समोर मोठी समस्या निर्माण झाली होती.  पवार यांची अडचण समजताच फणसवणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सत्यवान विचारे यांनी शुक्रवार पासून स्वतः त्यांच्या घरी जावून त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. याबरोबरच त्यांची औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यासाठी संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात , डॉ . अमित ताठरे ,लायन्स क्लबचे अमोल पाटणे आदींनी प्रयत्न सुरु केले. यानंतर स्थानिक पत्रकारांनी  जिल्हा पोलीसांना एक ट्विट केले. 

प्रवीण मुंढे यांनी ट्विटची घेतली दखल

 जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . प्रवीण मुंढे यांनी या ट्विटची तातडीने दखल घेऊन संगमेश्वरचे पोलीस निरिक्षक उदयकुमार झावरे यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या  पोलीस निरिक्षक झावरे आपले सहकारी मसुरकर , मांडके , भाऊ मोहिते यांच्यासह कोंड उमरे येथे गेले आणि वस्तूस्थिती जाणून घेतली . अशोक पवार यांना  संगमेश्वर पोलीस स्टेशनला आणून पुणे येथे जाण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत संगमेश्वर येथील बाबू चिचकर यांची सुमो गाडी उपलब्ध करुन दिली.  पत्रकारांनी यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे आणि पोलीस निरिक्षक उदय झावरे यांच्या तत्परते बद्दल पोलीस दलाचे विशेष अभिनंदन केले . शनिवारी दुपारी सुमो गाडीने अशोक पवार आपल्या पत्नीसह कोथरूड पुणेकडे रवाना झाले .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT