political changes possibility in rajapur ratnagiri 
कोकण

कोकण : राजापुरात आघाडीच्या पराभवाने बदलाची नांदी

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : गेली चार वर्षे सत्ताधाऱ्यांना साथ देणाऱ्या भाजपच्या एकमेव नगरसेवकाने अंदाजपत्रक मंजुरीच्या बैठकीमध्ये तटस्थाची भूमिका घेतली. त्याला सत्ताधारी नगरसेवकांच्या अनुपस्थितीची जोड मिळाली. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर चार वर्षामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदा तांत्रिकदृष्ट्या पराभवाची नामुष्की ओढवली. यातून पालिकेमध्ये नव्या राजकीय घडामोडीला सुरवात झाली आहे. लोकनियुक्त सतरा आणि स्वीकृत दोन अशा 19 नगरसेवक असलेल्या येथील नगर पालिकेमध्ये दोन नगरसेवकांच्या आकस्मिक निधनानंतर कॉंग्रेस सहा, शिवसेना सात आणि राष्ट्रवादी-भाजपचे प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला भाजपची साथ आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीकडे आठ तर विरोधी शिवसेनेकडे सात संख्याबळ आहे. भाजपच्या साथीने सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने सभागृहामध्ये सहज बाजी मारली जाते. गत महिन्यामध्ये अर्थसंकल्प मंजुरीच्या बैठकीमध्ये सत्ताधारी गटाचा सभागृहामध्ये तांत्रिक पराभव झाला होता. अर्थसंकल्प मंजुरीच्या सभेच्यावेळी सभागृहामध्ये सत्ताधारी आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. भाजपने तटस्थाची भूमिका घेतली. या साऱ्याचा फटका बसला. भविष्यामध्ये सभागृहातील तांत्रिक पराभव वाचवायचा असेल तर, गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित ठेवताना भाजपची साथ मिळविण्याचा सत्ताधारी आघाडीच्या गटाला प्राधान्याने विचार करावा लागणार आहे. मात्र, प्रभागातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद न केल्याने भाजपचे गोविंद चव्हाण नाराज आहेत. 

भाजप नगरसेवकाचे पाठबळ कायम ठेवणार? 

वर्षअखेरीला पंचवार्षिक निवडणुकाही होणार आहेत. त्यापूर्वी येत्या काही महिन्यांत पोटनिवडणुका होण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकाची नाराजी दूर करून त्याचे पाठबळ कायम ठेवण्याचे आव्हान आघाडीसमोर ठाकले आहे. त्यामध्ये सत्ताधारी गट यशस्वी होणार का तसेच मागील काही वर्षे सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याची जाण ठेवून भाजपची सत्ताधारी गटाला साथ राहणार का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

माझ्या प्रभाग-1 मधील विकासकामांसाठी तरतुदीसंबंधित कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने अर्थसंकल्प मंजुरीच्यावेळी आपण तटस्थ राहिलो. आपण विकासकामांना प्राधान्य दिले. शहरासह आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सत्ताधारी आघाडीला आपण यापूर्वी साथ दिलेली आहे. अद्यापही आपण आघाडीच्या विरोधात नसून सोबतच आहोत. याचा सत्ताधाऱ्यांकडून भविष्यामध्ये सकारात्मक विचार केला जाईल, ही अपेक्षा. 

- गोविंद चव्हाण, भाजपचे नगरसेवक 

एक नजर.. 

  • कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला भाजपची साथ 
  • आघाडीकडे आठ तर विरोधी सेनेकडे सात संख्याबळ 
  • अर्थसंकल्प मंजुरीच्या बैठकीत सत्ताधारी गटाचा तांत्रिक पराभव 
  • आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित, भाजप राहिला तटस्थ 
  • भविष्यात भाजपची साथ मिळविण्याचा विचार करावा लागणार 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प, प्रवाशांचा संताप

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT