sakal
कोकण

पाली खोपोली राज्य महामार्गाची दुरवस्था; शिवसेनेतर्फे रस्ता रोको

शिवसेनेतर्फे रस्ता रोको, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

पाली: पाली खोपोली राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे. खराब व अरुंद रस्त्यामुळे गुरुवारी (ता.16) सकाळी आंबोले गावजवळ मोटारीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर एमएसआरडीसी अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृताच्या कुटुंबांला 20 लाखाची भरपाई द्यावी. या मागणीसाठी सुधागड शिवसेनेतर्फे राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली दुपारी काहीवेळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी येथे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

अनिल दळवी असे मयत वृद्धाचे नाव आहे. हे रस्त्याच्या बाजूने जात असतांना पाठून येणाऱ्या मोटरची त्यांना जोरात धडक बसली आणि त्यांचा मृत्यू झाला. रस्ता अरुंद असल्याने तसेच समोरून वाहन येत असल्याने मोटर चालकास गाडी नेण्यास जागा नसल्याने मोटारीची दळवी यांना धडक बसली. मोटार चालका विरोधात पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सकाळला दिली.

तसेच एमएसआरडीसी अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृताच्या कुटुंबांला 20 लाखाची भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन तालुका शिवसेना आणि युवासेने तर्फे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना देण्यात आले आहे. तसेच संबधीत अधिकारी व ठेकेदार यांच्या सोबत बैठक घेतली जाईल असे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. असे शिवसेना नेते राजेंद्र राऊत यांनी सकाळला संगितले.

रास्तारोको आंदोलन करतेवेळी व निवेदन देतांना शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राऊत, तालुका युवासेना अधिकारी सचिन डोबळे, शिवसेना पाली शहर प्रमुख प्रदीप (दादू) गोळे, किशोर खरीवले, किरण पिंपळे, अजय मूळे, भास्कर दुर्गे, विजय भउड, निखिल शहा, प्रमोद खोडागळे, प्रवीण खाडे, निखिल खामकर व दीपेश लहाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उपसरपंच शिरीष मांढरे, ग्रामस्थ मनोज मोरे, योगेश दळवी, सुरेश सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वारंवार अपघात

वाकण-पाली-खोपोली हा राज्यमार्ग क्र. 548 (अ) असून हा मार्ग एकूण 39 किलोमीटरचा लांबीचा आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सन 2016 पासून हाती घेण्यात आले. शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा मार्ग संपूर्णपणे क्रॉक्रेटचा करण्यात येत आहे. यासाठी शासनाकडून सुमारे 198 कोटीची तरतूद ही करण्यात आली आहे.

या मार्गावर देवन्हावे, मिरकुटवाडी, इमॅजिका, उंबरे, गोंदाव फाटा, दुधाने वाडी, रासळ, पाली, बलाप व राबगाव या गावांजवळ रस्त्याची खूप खराब अवस्था झाली आहे. तसेच इतर ठिकाणी देखील कमी अधिक प्रमाणात खड्डे आहेत. यामुळे येथे वारंवार अपघात होतात. कामाची गती व दर्जा बाबत प्रश्नचिन्ह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT