pracation of bird flu in rajapur bird survey in ratnagiri 
कोकण

कोकण : राजापुरात बर्ड फ्लूमुळे पक्षी सर्वेक्षण होणार ; आठ पक्ष्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : कोरोना विषाणूचे थैमान हळूहळू कमी होऊ लागलेले असताना बर्ड फ्लूचा ज्वर आता वाढू लागला आहे. राजापूर शहरासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आठ पक्षी मृतावस्थेमध्ये सापडले आहेत. त्यामध्ये सात कावळ्यांचा तर, एका कबुतर पक्ष्याचा समावेश आहे. मृतावस्थेमध्ये सापडलेले पक्षी वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले असून, त्यांचा अद्यापही अहवाल आला नसल्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रमोद सुर्वे यांनी सांगितले. 

संभाव्य बर्ड फ्लू लक्षात घेवून पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्‍यात पक्षी सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृतावस्थेमध्ये सापडलेल्या पक्ष्यांपैकी काही पक्षी जास्त कुजलेल्या स्थितीमध्ये, तर काही पक्ष्यांची मान नसलेल्या स्थितीमध्ये होते. असे पक्षी वगळून उर्वरित पक्षी वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. सुर्वे यांनी दिली.

प्रयोगशाळेमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविलेल्या या मृतावस्थेतील पक्ष्यांचा अद्यापही वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नाही. संभाव्य बर्ड फ्लूला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पोल्ट्रीधारकांशी संपर्क साधून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंदस्थितील पोल्ट्रीचे निर्जतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्याचे डॉ. सुर्वे यांनी स्पष्ट केले.

...तर रेड झोन जाहीर

संभाव्य बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेऊन त्याला तालुक्‍यात रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रमोद सुर्वे यांनी सांगितले. पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्‍यात पक्षी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून, मृतावस्थेतील सापडलेल्या पक्ष्याचा बर्ड फ्लू संसर्ग म्हणून वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या गावामध्ये रेड झोन करण्याची तयारी प्रशासनाने केल्याचे डॉ. सुर्वे यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT