Pramod Jathar Comments On MLA Deepak Kesarkar Sindhudurg Marathi News  
कोकण

केसरकरांकडून केला जाणारा राणेंचा बागुलबुवा लांडगा आला रे आला सारखा

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दीपक केसरकरांकडून करण्यात येणारा राणेंचा बागुलबुवा आता लांडगा आला रे आला सारखा झाला आहे. त्यांच्या भुलथांपाना आता नागरिक फसणार नाही, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली. 

पुर्ण बहुमत असलेल्या या पालिकेत नगराध्यक्ष पदाच्या संजु परब यांना निवडून द्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांच्या निधीचे गिफ्ट सावंतवाडीकरांना देईन, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर, ऍड. सिध्दार्थ भांबुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

100 कोटी रुपयांचे गिफ्ट सावंतवाडीकरांना देऊ

ते म्हणाले, ""येथील नगराध्यक्ष पोट निवडणुकीच्या पार्श्‍वभुमिवर मी सावंतवाडी शहरात फिरलो. यावेळी लोकांच्या मनातील प्रश्‍न जाणुन घेण्याचा प्रयत्न झाला. एकुणच लोकांचा प्रतिसाद लक्षात घेता भाजपचे संजू परब हे मोठ्या मताधिक्‍यानी निवडून येथील अशा विश्वास आम्हाला आहे. आज येथील पालिकेच्या सभागृहात भाजपचे एकुणच दहा सदस्य आहेत पूर्ण बहुमत भाजपकडे आहे. या बहुमताचा विचार करून इथली सज्ञान जनता संजू परब निवडून देतील. ही निवडणूक वॉटर, मीटर व गटार या तीन गोष्टीवर लढवणे गरजेचे आहे. नेहमी राण्यांचा बागल बुवा करून दाखविण्यापेक्षा शहरवासियांच्या गरजा पूर्ण होतात की नाही याकडे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे जर सावंतवाडीकर यांनी आम्हाला नगराध्यक्ष दिल्यास या समस्या सोडवण्यासाठी मी केंद्र शासनाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचे गिफ्ट सावंतवाडीकरांना देईन.' 

मंत्रिपदाचा काय उपयोग? 

जठार म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीमध्ये केसरकर उभे होते म्हणून त्यांना सावंतवाडीकरांनी मते दिली; मात्र त्यांचे अनेक सहकारी भाजपला मिळाले आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत व विकास जनतेला आवडलेला नाही. फक्त नारायण राणे यांचा बागुलबुवा दाखवून मते लाटण्याचा धंदा केसरकरांनी बंद करावा. त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा त्यांनी किती उपयोग केला? ""कॉंग्रेसकडून व्हिप बजावला तरी ही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती या निवडणुकीत भाजप बाजी मारेल.''  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT