Pregnant mother Corona Negative near Sawantwadi 
कोकण

आनंददायी ...कोरोना पॉझिटीव्ह रूग्णासोबत प्रवास केलेली सावंतवाडीतील ती गरोदर माता निगेटिव्हच.....

सकाळ वृत्तसेवा

ओरोस  (सिंधुदुर्ग) : कोरोना पॉझिटीव्ह रूग्णासोबत प्रवास केलेली ती सावंतवाडीजवळील गरोदर माता कोरोना निगेटिव्ह आहे. ही माहिती आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. 
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे परिसरात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णासोबत प्रवास केलेली  गरोदर महिला असल्याबाबत चर्चा होती.

हेही वाचा- चिंता वाढली .... सिंधुदुर्गात आणखी एक पॉझिटिव्ह ....

ती गरोदर महिला मुंबई येथून आली आहे. तिला सावंतवाडी येथे सोडण्यासाठी आलेले तिचे मामा आज कोल्हापूर येथे कोरोना  पॉझिटीव्हवअसल्याचे समजले आहे. या  महिलेची तपासणी करण्यात आली असून तिचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तिने 25 एप्रिलला जिल्हा रुग्णालय येथे एका अपत्यास जन्म दिला असून माता व बालक दोन्ही तंदरूस्त आहेत. 


 जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 69 रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यातून तपासणीसाठी आजपर्यंत एकूण 349 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 316 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर अजून 33 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. तर आरोग्य विभागातर्फे आज 2720 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 228 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT