pregnant women case in ratnagiri kokan marthi news 
कोकण

पोलिसांचा मदतीचा हात ;अन् ती गरोदर महिला पोहचली दवाखान्यात...

सकाळ वृत्तसेवा

देवरुख (रत्नागिरी) : गरोदर महीलेला रिक्षातुन दवाखान्यात नेताना पेट्रोल संपले मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संगमेश्वर पोलिसांनी पेट्रोल उपलब्ध करून दिले. यामुळे त्या महिलेवर वेळीच उपचार झाले. यामुळे लॉकडाऊन मधे संगमेश्वर पोलिसांच्या माणुसकीचा आणखी एक किस्सा पुढे आला. 

संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते भिमनगर येथील सौ. श्रावणी सुजीत सांवत ( २६)  ही महीला पाच ते सहा महिन्याची गरोदर आहे. आज सकाळी अचानक तिच्या पोटात दुखु लागल्याने संगमेश्वर येथिल ग्रामिण रुग्णालयात नेण्यासाठी गावातीलच संदीप मोहीते यांची रिक्षा घेण्यात आली.

रिक्षातील पेट्रोल संपले अन्
 सध्य्या राज्यात कोरोनामुळे लाॅकडावुन असुन वाहातुकीस पुर्ण बंदी असुनही केवळ माणुसकीच्या नात्याने संदीप यांने रिक्षा संगमेश्वर रुग्णालयात नेली तेथील वैद्यकीय अधिकारी श्री.मोरे यांनी श्रावणीला तपासले असता सोनोग्राफी करण्यासाठी खासगी दवाखान्यात पाठवले,  पण त्याच वेळी रिक्षातील पेट्रोल संपले .  पेट्रोल पंपावर रिक्षाला पेट्रोल देण्यास मनाई असल्याने रिक्षा चालकापुढे मोठी अडचण निर्माण  झाली त्याने पत्रकार सत्यवान विचारे यांना याविषयी भ्रमणध्वनी वरुन कल्पना दीली.

 म्हणून महीलेवर वेळेत ऊपचार झाले

विचारे  यांनी परास्थीतीचे गांभिर्य ओळखुन संगमेश्वरचे बिट अमलदार श्री.झापडेकर यांना कळवले , झापडेकर यांनी तात्काळ पेट्रोल पंपात फोन करुन सबंधीत रिक्षा चालकास ईंधन देण्याच्या सुचना केल्याने ईंधन  मिळाल्याने महीलेवर वेळेत ऊपचार झाले .पोलीस हवालदार झापडेकर व विचारे यांनी दाखवलेल्या माणुसकीने भारवलेले पिडीत महीलेचे पती सुजीत सांवत यांनी दोघांचेही आभार मानले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT